कलाकार कितीही मोठा झाला तरीही त्याचे पाय जमिनीवर असावेत तर त्याला लोक नेहमी लक्षात ठेवतात असं म्हणलं जात. मनोरंजन विश्वातील असच एक नाव म्हणजे बिग बी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते अमिताभ बच्चन. अनेक चित्रपट आणि न विसरता येणाऱ्या भूमिका साकारून अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.(Amitabh Bachchan BIke Ride)
चित्रपटांसोबतच बिग बी सध्या व्हायरल होतायत त्यांच्या नव्या व्हिडिओ फोटो मुळे. झालं असं कि अमिताभ बच्चन घरातून शूटिंगला जाण्यासाठी निघाले पण मधेच लागलेल्या ट्रॅफिकला ते वैतागले. आणि मग यावर उपाय काढण्यासाठी ते गाडीतून उतरले आणि चक्क एका अनोळखी व्यक्तीला त्यांनी लिफ्ट मागितली. बिग बी यांना सेटवर पोहचण्यास उशीर झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील एकाकडे लिफ्ट मागत त्या सेटवर सोडण्याची विनंती केली.

त्या व्यक्तीसोबत बिग बी यांनी बाईक राईड तर केलीच याशिवाय सेटवर वेळेतही पोहचले. बिग बी यांच्या नातीनं नव्या नवेलीनं देखील आजोबांचे कौतूक केले आहे. तिला तर तो व्हिडिओ पाहताना हसू आवरलेलं नाही. त्या व्यक्तीमुळे अमिताभ हे सेटवर लवकर पोहचले. बिग बी यांनी त्यांच्या इंस्टा अकाउंटवरुन तो खास व्हिडिओ शेयर केला आहे.(Amitabh Bachchan BIke Ride)