सोमवार, सप्टेंबर 25, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “१० वर्षांपूर्वी केली होती घराची नोंदणी…”, अभिनेता शशांक केतकरची मोठी फसवणूक, म्हणाला, “मीरा रोड शहरात…”

“१० वर्षांपूर्वी केली होती घराची नोंदणी…”, अभिनेता शशांक केतकरची मोठी फसवणूक, म्हणाला, “मीरा रोड शहरात…”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
सप्टेंबर 7, 2023 | 9:55 am
in Marathi Masala
Reading Time: 1 min read
Shashank Ketkar On Big Scam

"१० वर्षांपूर्वी केली होती घराची नोंदणी…", अभिनेता शशांक केतकरची मोठी फसवणूक, म्हणाला, "मीरा रोड शहरात…"

छोटा पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. आजवर शशांकने त्याच्या शांत, सुसंस्कारी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. पडद्यावर त्याच्या समजूतदार, संयमी, शांत भूमिका पाहून तो शांत जरी वाटत असला तरी खऱ्या आयुष्यात तो बऱ्यापैकी स्पष्टवक्ता आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण सोशल मीडियावरून शशांकने कित्येकदा वाचा फोडली आहे. शिवाय त्याने स्पष्टपणे भाष्य करत मुद्दे मांडले देखील आहेत. काही दिवसांपासून शशांक त्याच्यासोबत झालेल्या घोटाळ्याबाबत बोलत होता. (Shashank Ketkar On Big Scam)

याबाबत शशांक केतकरने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर झालेल्या एका घोटाळ्याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं. तसेच याप्रकरणी त्याने संबंधित प्रशासनाला जाबही विचारला आहे.

याबाबत बोलताना शशांक म्हणाला, “मी २०१३ मध्ये मीरा रोडमध्ये एका घराची नोंदणी केली होती. आता त्याला १० वर्ष उलटली आहे. पण १० वर्षात एकही वीट माझ्या मालकीची झालेली नाही”, अशी खंत शशांकने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “ती तुमची चॉईस आहे…” ऑनलाईन खेळाच्या जाहिराती करण्यावर गिरीजा ओक स्पष्टच बोलली, म्हणाली, “मी जाहिरात…”

“इथे बिल्डरला काही मजल्यांची परवानगी मिळाली होती. त्यावर त्याने दहा-वीस मजले बांधले आहेत. मीरा रोड शहरात वीस- वीस मजली इमारत उभी राहते आणि ती कोणाच्या नजरेस पडत नाहीत?” असा सवाल शशांकने उपस्थित केला आहे.

आणखी वाचा -‘शुद्ध देशी रोमान्स’ची दशकपूर्ती ! सुशांत सिंग राजपुतच्या आठवणीत परिणीती चोप्रा भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या…”

याशिवाय त्याने चित्रपटसृष्टीतील फसवणुकीबाबतही भाष्य केलं, तो म्हणाला, “इतकंच नाही तर चित्रपटसृष्टीतही अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागते. “आम्ही असा सिनेमा देऊ, अशी भूमिका देऊ अशी आमिष दाखवायची. काम पूर्ण करुन घ्यायचे. पैसे पुढच्या टप्प्याचे असतात ते द्यायचेच नाही, फोन उचलायचेच नाही. कारण सांगत राहायची, हाही एक घोटाळाच झाला. खऱ्या आयुष्यात आम्ही अशा घोटाळ्यांचा सामना करत असतो”, असेही शशांकने म्हटलं आहे.

Tags: entertainmentshashank ketkarShashank Ketkar On Big Scam

Latest Post

Titeeksha Tawde shared Memory
Trending

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करायची मॅकडोनॉल्डमध्ये काम; फोटो शेअर करत म्हणाली, “पहिला जॉब…”

सप्टेंबर 24, 2023 | 5:40 pm
Marathi Serial TRP Rate
Television Tadka

जुई गडकरीवर वरचढ ठरली तेजश्री प्रधान; ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल

सप्टेंबर 24, 2023 | 2:02 pm
Raghav Parineeti Wedding
Bollywood Gossip

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : “भव्य दिव्य महल अन् पंजाबी गाणी…”, थाटामाटात परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांना लागली हळद, पंजाबी गाण्यांवर रंगली संगीताची मैफिल

सप्टेंबर 24, 2023 | 12:52 pm
Gauri Kulkarni Engaged
Television Tadka

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी अडकणार लवकरच विवाहबंधनात? रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

सप्टेंबर 24, 2023 | 11:57 am
Next Post
Singer Malini Rajurkar Death

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर काळाच्या पडद्याआड, सुबोध भावेची भावुक पोस्ट, म्हणाला, "तुम्हाला प्रत्यक्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist