शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शुद्ध देशी रोमान्स’ची दशकपूर्ती ! सुशांत सिंग राजपुतच्या आठवणीत परिणीती चोप्रा भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 7, 2023 | 9:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Parineeti Chopra On Sushant Sing Rajput

'शुद्ध देशी रोमान्स'ची दशकपूर्ती ! सुशांत सिंग राजपुतच्या आठवणीत परिणीती चोप्रा भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "माझ्या…"

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शुद्ध देशी रोमान्स’ या चित्रपटाने तरुण प्रेक्षक वर्गाला वेड लावलं होतं. दिग्दर्शक मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून परिणीती चोप्रा व सुशांत सिंग राजपुतची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकली होती. नुकतीच या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त परिणीती चोप्राने केलेली एक खास पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेतेय. (Parineeti Chopra On Sushant Sing Rajput)

सुशांत सिंग राजपुत आज आपल्यात नाही. पण त्याची प्रत्येक वेळी आठवण आल्यावाचून काही राहत नाही. सुशांत सिंग राजपुतचा स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आज जरी तो आपल्यात नसला तरी त्याचा चाहत्यांच्या मनात त्याच स्थान हे कायम आहे. शिवाय त्याच्यासोबत काम केलेले कलाकार ही सुशांतला विसरू शकत नाही आहेत. अशातच सुशांत सिंग राजपुत व परिणीती चोप्रा यांच्या’ शुद्ध देशी रोमान्स’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त परिणितीने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “ती तुमची चॉईस आहे…” ऑनलाईन खेळाच्या जाहिराती करण्यावर गिरीजा ओक स्पष्टच बोलली, म्हणाली, “मी जाहिरात…”

परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटातील काही सीन्सचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं आहे की, “वेळ किती लवकर निघून जाते. ‘शुद्ध देसी रोमान्स’ला १० वर्ष पूर्ण झाली. मज्जा, बिझी शूट पण हळव्या क्षणांनी सिनेमाच्या आठवणी भरलेल्या आहेत. दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव छानच होता. ऋषी सर आम्ही तुम्हाला मिस करतो. सुशांत तुझी तर खूपच जास्त आठवण येते. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तू एक होतास.’

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसाठी कपडे डिझाइन करणारी ‘ती’ अशी झाली अभिनेत्री, म्हणाली, “विराज जगतापने मला…”

परिणीतीच्या या व्हिडीओखली अनेकांनी कमेंट करत सुशांतला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. “सुशांत तुझी खरंच खूप आठवण येते,’या सिनेमाचं एक वेगळंच आकर्षण होतं” असं एका युजरने म्हटलं आहे. तर आणखी एकाने “सुशांत खूप आठवतो’ अशी कमेंट केली आहे.

Tags: entertainmentParineeti Choprashuddha desi romancesushant sing rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Shashank Ketkar On Big Scam

"१० वर्षांपूर्वी केली होती घराची नोंदणी…", अभिनेता शशांक केतकरची मोठी फसवणूक, म्हणाला, "मीरा रोड शहरात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.