Ameesha Patel Pregnancy Rumours : बॉलिवूडची ‘सकिना’ म्हणजेच सुंदर अभिनेत्री या अमीषा पटेल नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. परंतु यावेळी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. आणि ही चर्चेत आलेली गोष्ट आश्चर्याचा धक्का देणारी आहे. नेहमीच अमीषा सोशल मीडियावर सक्रिय राहत अनेक नवनवीन फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने बिकिनीमध्ये स्वत: चे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याने अनेकांच्या नजरा वळविल्या आहेत. हे फोटो पाहून अमीषा प्रेग्नेंट आहे की काय या चर्चांना उधाण आलं आहे. फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्री गर्भवती असल्याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.
अभिनेत्रीचे हॉट अंदाजात बिकिनीतील फोटोशूट पाहून या चर्चा अधिकच रंगतदार झाल्या आहेत.
अमीषा पटेल गरोदर आहे का?
अमीषा पटेलने तिचे हे फोटो काल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. ज्यामध्ये ती हिरव्या स्वीमसूटमध्ये दिसली आहे. यासह, तिने पांढरे शर्ट, डोळ्यांवरील चष्मा आणि डोक्यावर एक टोपी देखील लागू केली आहे. फोटोमध्ये, अभिनेत्रीचे पोट किंचित मोठं दिसत आहे. आणि तिने पोटाला हात लावून फोटो पोस्ट केला आहे यांत ती गरोदर असल्याचेच भासत आहे. हे पाहून, नेटकऱ्यांनी असा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे की अमीशा गरोदर आहे.
आणखी वाचा – मच्छरांच्या मृत्यूची नोंद ठेवणारी मुलगी, मेल्यावर पेपरवर चिटकवूनही ठेवते, नाव, ठिकाण, वेळ लिहिते अन्…
अमीषाचे हे फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी अनेक कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे की, “गरोदर?”, असं म्हणत सवाल केला आहे. तर एकाने, “तू आई होणार आहेस का?” असंही विचारलं आहे. तर दुसर्याने असे लिहिले की, “अभिनंदन आई”. त्याचवेळी, एका नेटकऱ्याने, “पण डॅडी कोण आहे?”, अशी कमेंट केल्याने चाहते गोंधळलेले आहेत. अभिनेत्रीने अद्याप या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशा परिस्थितीत असेही होऊ शकते की हा अभिनेत्रीच्या शूटचा फोटो आहे.
आणखी वाचा – तुमचा जोडीदारही सिगारेट ओढतो का?, उत्तर हो असेल तर तुमच्यासाठीही ठरु शकतं घातक कारण…
अमीषाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अमीषा पटेलला अखेर सनी देओलसह ‘गदर २’ या चित्रपटात पाहिले होते. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले. दोघांचा हा चित्रपट ‘गदर’ चा सिक्वेल होता.