शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दागिने, इतक्या लाखांचा चेक अन्…; अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, ५० गरीब जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 11:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ambani Family Is Getting Mass Wedding

दागिने, इतक्या लाखांचा चेक अन्…; अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, ५० गरीब जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येत आहे. १२ जुलै रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधीच या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नातही देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्तींना पाहता येणार आहे. मात्र, या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाहसोहळ्याचे खास फोटोही समोर आले आहेत. (Ambani Family Is Getting Mass Wedding)

अंबानी कुटुंबाने गरीब कुटुंबातील लोकांसाठी सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अंबानींचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. ४.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, ठाणे’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबानी परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे ८०० लोक उपस्थित होते.

आणखी वाचा – इतकी सुंदर दिसते ‘अप्पी आमची…’मधील अर्जुनची लेक, पहिल्या वाढदिवसाला दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना अंबानी कुटुंबाने लग्नाच्या हंगामात देशभरात अशा शेकडो विवाहांचे आयोजन करण्याचे वचन दिले. या सोहळ्यात स्वत: नीता अंबानी व मुकेश अंबानीही उपस्थित होते. याशिवाय इशा अंबानी तिच्या पतीसह हजर असलेली दिसली. इतकंच नव्हे तर अंबानी परिवार या सोहळयाला उपस्थित होता. नीता अंबानी या खास कार्यक्रमासाठी लाल रंगाच्या साडीत पोहोचल्या होत्या. त्यांनी यावेळी साडीला मॅचिंग अशी पर्सही घेतली होती. साडीबरोबरच नीता अंबानी यांनी यावेळी खास हेअरस्टाईलही केली होती.

आणखी वाचा – अखेर घटस्फोटाच्या कागदाचं सत्य आलं अप्पी व अर्जुनसमोर, वहिनीचा डाव उधळत दोघेही एकमेकांना स्वीकारणार का?

नीता अंबानी यांनी समारंभात उपस्थित जोडप्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. अंबानी कुटुंबाने प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, लग्नाच्या अंगठ्या आणि नाकातील अंगठी यासह सोन्याचे दागिने दिले. या काळात नववधूंना पैंजण व पायातील जोडवीही दिल्या. प्रत्येक वधूला तिचे ‘स्त्रीधन’ म्हणून १.०१ लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला. याशिवाय प्रत्येक जोडप्याला वर्षभर टिकेल एवढा किराणा सामान आणि घरगुती वस्तूही भेट देण्यात आल्या. यामध्ये भांडी, गॅस शेगडी, मिक्सर, पंखा इत्यादी ३६ जीवनावश्यक वस्तू तसेच गादी व उशी यांचा समावेश आहे. समारंभानंतर सर्व लोकांसाठी भव्य डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे.

Tags: ambani familyAmbani Family Is Getting Mass WeddingAnant Ambani and Radhika Merchantentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
payal malik on arman malik second wedding

"माझ्यावर अन्याय झाला आहे", पायल मलिकने पहिल्यांदाच अरमान मलिकच्या दुसऱ्या लग्नाबाबत केलं भाष्य, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.