शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्यावर अन्याय झाला आहे”, पायल मलिकने पहिल्यांदाच अरमान मलिकच्या दुसऱ्या लग्नाबाबत केलं भाष्य, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
payal malik on arman malik second wedding

"माझ्यावर अन्याय झाला आहे", पायल मलिकने पहिल्यांदाच अरमान मलिकच्या दुसऱ्या लग्नाबाबत केलं भाष्य, म्हणाली…

सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसऱ्या सिझनची चर्चा सुरु आहे. प्रेक्षक या रिऍलिटी शोला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. बिग बॉस OTT ३ मध्ये एकूण १६ स्पर्धक होते. पण आता घरात १४ स्पर्धक उरले आहेत. नीरज गोयत व पायल मलिक यांना घराबाहेर पडावं लागलं. पायल मलिक ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चेत आहे. नुकतीच तिने ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यामध्ये पायलने अरमान व कृतिकाबरोबरच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पायल मलिक, तिचा पती अरमान मलिक आणि अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक हे तिघेही बिग बॉस ओटीटीमध्ये एकत्र पोहोचले होते. तिघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अरमान या नावामुळे अनेकांना वाटते की ते मुस्लिम आहेत किंवा त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे. मात्र,पायल मलिकने अशा अफवा फेटाळून लावल्या आहेत. ती म्हणाली, नाही, असं अजिबात नाही. तो मुस्लिम नाही आणि त्याने इस्लामचा स्वीकारही केला नाही. अरमान हिंदू जाट कुटुंबातील आहे. (payal malik on arman malik second wedding)

अरमानने पहिले लग्न पायलशी केले. यानंतर त्याचे दुसरे लग्न कृतिका मलिकबरोबर झाले. तुम्हाला न्याय मिळाला का, असे विचारले असता?. यावर पायलने मुलाखतीत सांगितले की, “हा अन्याय आहे, मी अरमान जीसाठी माझे घर सोडले होते आणि आठ वर्षांपासून त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांच्याबरोबरचं राहत होते. त्यांच्या आयुष्यात अचानक दुसरे कोणी आले तर माझ्यावर अन्याय झाला. पण त्याचबरोबर, सर्वांना हेदेखील माहित आहे की, आज आणि भविष्यातदेखील अरमान मलिकसाठी प्रथम पायल मलिक आहे आणि नंतर कृतिका आहे. कृतिकालाही हे माहीत आहे आणि आमच्या कुटुंबालाही हे माहीत आहे. अरमानची पहिली प्राथमिकता पायल आहे”.

आणखी वाचा – दागिने, इतक्या लाखांचा चेक अन्…; अंबानी कुटुंबाकडून सामूहिक विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, ५० गरीब जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

View this post on Instagram

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

पायलने दुसऱ्या लग्नानंतरही अरमानबरोबर राहण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, “फक्त प्रेम आणि माझा मुलगा चिकू. त्याच्यामुळे मी माझ्या दुसऱ्या लग्नानंतरही जगत आहे आणि खूप आनंदी आहे. मी असेच करत राहीन. मला राहण्याची सक्ती आहे किंवा मला राहावे लागेल असे नाही. ही माझी निवड आहे. माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे आणि ती त्या नात्यात राहत आहे, यावर कोणत्याही स्त्रीचा विश्वास बसणार नाही, कारण पैसा कितीही असला तरी पैशाने काही फरक पडत नाही. मी त्या नात्यात आहे ही माझी निवड आहे आणि मी त्यात खूप आनंदी आहे”.

आणखी वाचा – जावईबापूंचा मानपान, सासु-सासऱ्यांची खास तयारी अन्…; सासरवाडीत प्रथमेश परबचे लाड, पत्नीने शेअर केले खास फोटो

पुढे ती म्हणाली, “माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे जिने मला प्रथम स्थान दिले आहे. ती म्हणजे कृतिका. ती माझ्यावर अरमानपेक्षा जास्त प्रेम करते. मी काहीही बोलले तरी ती त्याचं वाईट वाटून घेते. ती माझ्याशी वाद घालत नाही. मी माझ्या घरातील बॉस महिला आहे, माझे घर मी चालवते. मी जे म्हणते तेच घडते. सुदैवाने सवत म्हणून भांडण करणारी मुलगी आली नाही. यासाठी मी देवाचे आभार मानते”.

Tags: arman malik weddingentertainmentpayal malik and arman malikpayal malik on arman malik second wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Actor Subodh Bhave expressed his disapproval of AI technology in the serials by saying "don't teach me".

“मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.