बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चित्रपटगृहांकडे शो द्या म्हणून भीक मागावी लागते आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मोठं विधान, म्हणाला, “महाराष्ट्रातच आम्हाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 25, 2023 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi movie screens issue

“चित्रपटगृहांकडे शो द्या म्हणून भीक मागावी लागते आणि...”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मोठं विधान, म्हणाला, “महाराष्ट्रातच आम्हाला...”

मराठी चित्रपटांना शो मिळत नाहीत, मराठी चित्रपट महाराष्ट्रातच चालत नाहीत अशा अनेक तक्रारी गेली कित्येक वर्ष ऐकायला मिळतात. पण एकमताने यावर अजूनही कोणताच पर्याय निघालेला नाही. एखादा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की, मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान दिलं जातं असे अनेक कलाकार मंडळी स्वतःहून बोलतात. याचबाबत आता पुष्कर जोगनेही भाष्य केलं आहे. त्याचा ‘बापमाणूस’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचनिमित्त त्याने आपलं रोखठोक मत मांडलं.

‘बापमाणूस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. याचबाबत पुष्करला विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, “‘बापमाणूस’ फादर्स डेला प्रदर्शित होणार होता. आपण महाराष्ट्रात राहतो तरीही मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळत नाही. चित्रपटगृहांकडे आम्हाला शो द्या म्हणून भीक मागावी लागते. बॉलिवूडही महाराष्ट्र व मुंबईमध्ये आहे. पण याचा सर्वात मोठा फटका मराठी चित्रपटांना बसतो”.

आणखी वाचा – Seema Deo Passes Away : ५२वर्षे अभिनेत्री सीमा देव यांनी एकच हिऱ्याचे कानातले वापरले कारण…; स्वतः केला होता खुलासा, म्हणालेल्या, “माझ्यासाठी…”

“आमच्या चित्रपटांना शो मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हेच सत्य आहे. फादर्स डेला जून महिन्यामध्ये एक-दोन मोठे हिंदी चित्रपट होते. तसेच एक इंग्लिश चित्रपटही होता. महाराष्ट्रात मार्वल्ससारखे चित्रपट चालतात. मराठी माणसं असे चित्रपट बघायला जातात पण मराठी चित्रपट बघायला जात नाहीत हेच मोठं दुर्देव आहे. याचमुळे आम्ही हा चित्रपट पुढे ढकलला. २५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करणार होतो. पण तेव्हा आणखी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. आपल्यामध्येही एकता नसली, मला विचारण्यात आलं नसलं तरी मी स्वतःहून माझा चित्रपट पुढे ढकलला”.

आणखी वाचा – Video : “बाबाही गेले अन्…”, आईच्या अंत्यसंस्कारानंतर अजिंक्य देवने जोडले हात, म्हणाला, “आई-बाबांनी नेहमीच…”

View this post on Instagram

A post shared by Goosebumps Entertainment (@goosebumpsent1)

पुढे पुष्कर म्हणाला, “मी अभ्यास केला आहे म्हणून सांगतो की, वर्षाला एकूण १५० मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील ४ ते ५ टक्के चित्रपटांना फायदा मिळतो. काही चित्रपट चालतात. आता ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटही चालला आणि त्यासाठी मी आनंदी आहे. पण मराठी चित्रपट चालण्याचं प्रमाण खूप कमी आहे. एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाला की, मराठी चित्रपटांना बाजूला केलं जातं. आणि हे तथ्य आहे. मी याआधी हे बोलायला घाबरत होतो. पण आता बोलायला मी घाबरत नाही”. आता पुष्करच्या या चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Allu Arjun wins National Awards

Video : थेट बायकोला उचलून घेतलं, किस केलं अन्…; राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर अल्लू अर्जुनचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.