बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सिकंदर’ ते ‘सैंधव’, या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणार ॲक्शन अन् डॉक्यूड्रामा असलेले चित्रपट व सीरिज, पाहा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Alaxander The Making Of A God Saindhav miss perfect mr and mrs smith upcoming ott webseries and movies see the details

‘सिकंदर’ ते 'सैंधव', या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणार ॲक्शन अन् डॉक्यूड्रामा असलेले चित्रपट व सीरिज, पाहा संपूर्ण यादी

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या पहिल्या क्रमांकावर टेंडींगवर आहे. हा चित्रपट हिंदीसह दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ‘सॅम बहादूर’ हा चित्रपटही प्रजासत्ताक दिनानिमित्त झी-५वर प्रदर्शित झाला आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिझ्नी प्लस हॉटस्टार, जिओ सिनेमा आणि लायन्सगेट प्लेवरदेखील मनोरंजक चित्रपट व वेबसिरीज येत आहे. यामध्ये ऐतिहासिक, ॲक्शन व डॉक्युड्रामा यांचा समावेश आहे.

(१) ‘अलेक्झांडर – द मेकिंग ऑफ अ गॉड’ (Alaxander- The Making Of A God) : ही सिरीज येत्या ३१ जानेवारीला नेटफ्लिक्सवर येत आहे. जर तुम्हाला इतिहासाशी संबंधित विषयांमध्ये रस असेल तर ही सिरीज फक्त तुमच्यासाठी आहे. या सीरिजमध्ये अलेक्झांडरची जगज्जेता बनण्याची आकांक्षा दाखवण्यात आली आहे. तज्ज्ञांशी संभाषणांसह अनेक मोहक दृश्यांचे नाट्यमयरित्या चित्रपट य सीरिजमध्ये करण्यात आले आहेत.

(२) ‘नेवर बॅक डाउन २’ (Never Back Down 2) : नेटफ्लिक्सची ही ॲक्शन फिल्म ‘नेव्हर बॅक डाउन’ येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे, याचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध ॲक्शन अभिनेता मायकेल जे व्हाईट यांनी केले आहे. या चित्रपटात मायकेलने मुख्य भूमिकाही साकारली आहे. 

(३) मिस परफेक्ट (Miss Perfect) : मिस परफेक्ट ही एक तेलुगु कॉमेडी कौटुंबिक सीरिज आहे. ज्यात लावण्य त्रिपाठी व अभिजीत दुद्दला हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. येत्या २ फेब्रुवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही मालिका तेलुगूसह हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषांमध्ये प्रसारित केली जाणार आहे.

(४) मिस्टर एंड मिसेज स्मिथ (Mr. And Mrs. Smith) : येत्या २ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओवर ही सीरिज येत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ ही डोनाल्ड ग्लोव्हर व माया अर्स्कीन अभिनीत स्पाय कॉमेडी सीरिज आहे. ही इंग्रजी भाषेत ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण, पोस्टही केली शेअर, बायकोसाठी सिद्धेशचीही कमेंट, म्हणाला, “तुला भेटण्याची…”

(५) सैंधव (Saindhav) : वेंकटेश यांची मुख्य भूमिका असलेला ‘सैंधव २’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहानंतर प्राइम व्हिडिओ या ओटीटीवर येणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट तामिळ, मल्याळम व कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार. मात्र अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही.

आणखी वाचा – पुलकित-क्रिती लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखपुड्याचे फोटो आले समोर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

(६) वन रेंजर (One Ranger) : येत्या २ फेब्रुवारी रोजी लायन्सगेट प्ले या ओटीटी माध्यमावर वन रेंजर प्रदर्शित होणार आहे. जोश हॉलॉवे टेक्सस रेंजरच्या भूमिकेत आहे. तर जेम्मा आर्टरटन या एजंटची भूमिका करत आहे. जो ब्रिटीश इंटेलिजन्सद्वारे भरती होतो. असे यात दाखवण्यात आले आहे.  

Tags: Alaxander The Making Of A Godentertainment newsMiss PerfectMr. And Mrs. SmithNever Back Down 2One Rangerott newsOTT ReleasedSaindhavअलेक्झांडर द मेकिंग ऑफ अ गॉडओटीटी प्रदर्शनओटीटी बातमीनेव्हर बॅक डाउन 2मिस परफेक्टमिस्टर अँड मिसेस स्मिथवन रेंजरसैंधव
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Vicky Jain On Sushant Singh Rajput

"या गोष्टींची पर्वा नाही…", अंकिता लोखंडे व सुशांत सिंह राजपूतच्या नात्याबाबत विकी जैन पहिल्यांदाच बोलला, म्हणाला, "मी असुरक्षित …"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.