शनिवार नंतर रविवार आला की बऱ्याच लोकांना आनंद होतो. परंतु संडेच्या दिवशी आराम केल्यामुळे दुसऱ्यादिवशी कामाला जाणाऱ्या व्यक्तींची दमछाक होताना दिसते. तसेच टेलिव्हिजनवर काम करत असताना कलाकारांना ठरवूनच सुट्टी घ्यावी लागते. अशातच अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडियो शेअर केला आहे. (Akshyaa Naik Monday Mood)
या व्हिडियोमध्ये अक्षया सेटवर झोपलेली दिसत आहे. या व्हिडियोवर अक्षयाने Have a great, enthusiastic week ahead असे कॅप्शन दिले आहे. यावर तिने हॅशटॅग मंडेमूड असं देखील लिहिलं आहे. अक्षयच्या या व्हिडियोवर तिच्या चाहत्यांनी हसण्याचे इमोजी देखील पाठवले आहेत.
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया नाईकने मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. अक्षयाने “ये रिश्ता क्या केहलता हैं” या हिंदी मालिकेत काम केल्यांनतर अक्षयला प्रसिद्धी मिळाली होती. अक्षया साकारत असलेली सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत “लतिका” ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
हे देखील वाचा: ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. अक्षया कायम चाहत्यांसोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते. तर सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. अशातच अक्षयाच्या एका पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. (Akshyaa Naik Monday Mood)

इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर करत अक्षयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यांत तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने फोटोसोबत घरगुती जेवण करणाऱ्या वस्तूंचा समावेश केला आहे. आणि नवीन प्रोजेक्टची माहिती असे कॅप्शन दिले आहे. अक्षयाची ही पोस्ट पाहून नक्की काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खाण्यावर आधारित तिचा नवीन कोणता तरी प्रोजेक्ट असेल असं वाटतंय. तर तिची ही पोस्ट पाहून अक्षया लवकरच नवीन चित्रपटात दिसणार का? अक्षया सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून एक्झिट घेणार का? की नवं हॉटेल वगैरे सुरु करून व्यवसायात पदार्पण करतेय का? असे बरेच प्रश्न पडले आहेत.