गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“म्हणून मला चित्रपटातून काढलं”,सुमितने स्वतः केला खुलासा`

Neelam Kaleby Neelam Kale
एप्रिल 3, 2023 | 1:47 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sumeet Pusavale

Sumeet Pusavale

प्रत्येक कलाकार हा मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकारांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांमधून केली आणि नंतर मोठ्या पडद्यावर नाव कमावलं.स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, प्रसाद ओक यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मालिकांमधून केली होती.तर मालिकेतील सर्वच कलाकरांना मोट्या पडद्यावर संधी मिळते असं नाही आणि मिळाली तरी त्यासाठी अफाट कष्टसोबतच त्यांना काही गोष्टींचा सामना करावा लागतो. असाच एक धक्कादायक खुलासा एका मराठमोळ्या अभिनेत्याने केला आहे.(Sumeet Pusavale)

कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामांच्या नावानं चांगभलं ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करते. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारून अभिनेता सुमीत पुसावळे हा घराघरात पोहचला.नुकतंच काही महिन्यांपूर्वी तो विवाह बंधनात अडकला,पण या अभिनेत्यासोबाबत एक घटना घडली, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.

हे देखील वाचा: ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार

सुमितला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. सुमितला सोशल मीडियावर कमी फॉलोवर्स असल्यामुळे एका चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओसाठी नकार देण्यात आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या घटनेबद्दल खंत व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर जास्त फॉलोवर्स नसल्याने काम देण्यास नकार मिळाला यामुळे सुमित चकीत झाला. ‘मी गेली कित्येक वर्ष बाळूमामांची भूमिका साकारतोय. अनेकजण मला माझ्या भूमिकेमुळे ओळखतात. जेव्हा ते मला भेटतात तेव्हा ते मला बाळूमामा म्हणून हाक मारतात. पण माझ्यासोबत नुकतंच जे घडलं त्यामुळे मी प्रचंड दुःखी झालो आहे.’, ‘मी नुकतीच एका चित्रपटासाठी आणि म्युझिक व्हिडिओसाठी ऑडिशन दिली होती. त्यासाठी माझी निवडही झाली पण त्यानंतर माझं सोशल मीडिया अकाऊंट आणि फॉलोवर्स पाहून त्यांनी मला नकार दिला. मला काय बोलू तेच कळत नव्हतं. या घटनेमुळे पूर्णपणे हताश आलो. मला कळेच ना मी काय करू. या कारणासाठी त्यांनी मला नकार दिला. दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय. तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमच्याकडे किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूप वाईट आहे.’ अशी खंत त्याने मुलाखतीत व्यक्त केली.(Sumeet Pusavale)

पुढे सुमीत म्हणाला,’मी सध्या माझ्या पत्नीच्या मदतीने सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हिडिओ आणि रिल्स पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हे सोशल मीडिया प्रेशर नाहीये तर हे आता करावंच लागणार आहे.’

Tags: entertainmentits majjamarathi serialsumeet pusavale
Neelam Kale

Neelam Kale

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Isha Arundhati

ईशा उचलणार मोठं पाऊल, पुन्हा एकदा अरुंधती-अनिरुद्ध एकमेकांसमोर उभे ठाकणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.