पडद्यावरील प्रेक्षकांना आवडणारी जोडी रियल लाईफमध्ये एकत्र आली तर प्रेक्षक खूप खुश होतात. असे अनेक रील लाईफ कप्पल रिअल लाईफ मध्ये एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. “तुझ्यात जीव रंगला” मालिकेतून राणा दा आणि पाठक बाईंनी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अभिनयातून भुरळ पाडली. ही जोडी महाराष्ट्रातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. ते दोघेही सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट शेअर करत असतात आणि एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. काही महिन्यापूर्वीच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे विवाह बंधनात अडकले आहेत. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अक्षयाने हार्दिकसाठी एक फोटो शेअर केला आहे.(akshaya hardeek)

या पोस्टला तिने “मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना बस ये समझ लो, लफ्ज कम मोहब्बत ज्यादा है!” असे कॅप्शन देत अक्षयाने हार्दिक वरच प्रेम व्यक्त केलं आहे. या फोटो मध्ये अक्षया आणि हार्दिकची केमेस्ट्री छान जुळून आलेली दिसतेय. उन्हाच्या सावलीत हातात गुलाब घेऊन काढलेला हा फोटो एकमेकांना चांगलीच कॉम्प्लिमेंट देताना दिसतोय. अक्षया आणि हार्दिक यांची ओळख सेटवर झाली. मात्र या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनी कधीच कोणाला सांगितले नाही.

अंजली आणि राना दाच्या लग्नात त्यांच्या सोबत इतर कलाकारांनीही धमाल केली होती. तर आजच्या पोस्ट प्रमाणेच अक्षय आणि हार्दिक ने घेतलेले उखाणे सुद्दा चांगलेच व्हायरल झाले होते. (akshaya hardeek)