सिनेसृष्टीत काम करत असताना अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबंधनात अडकली आहेत. त्यांची रील लाईफ केमिस्ट्री रिअल लाईफमध्ये ही पाहणं रंजक ठरलं. अशातच छोटा पडदा गाजवणाऱ्या एका मराठमोळ्या आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीने एकत्र येत चाहत्यांना आनंदाचा झटका दिला. ही जोडी म्हणजे मराठी मालिकाविश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. छोटया पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षया व हार्दिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. (Akshaya Deodhar and Hardeek Joshi)
अक्षया व हार्दिक या दोघांची रील लाईफ केमिस्ट्री प्रेक्षकांना जितकी आवडली होती, तितकीच ती रिअल लाईफ सुद्धा अनेकांना भावली होती. या मालिकेतून त्यांनी अनेकांची मनं जिंकली. मात्र मालिका संपल्यानंतर प्रेक्षक या जोडीला मिस करताना दिसले. त्यांनतर ज्यावेळी या दोघांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली, तेव्हा मात्र त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर दोघंही लग्नानंतरचा प्रत्येक क्षण साजरा करत आहेत.
हार्दिक व अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ते त्यांचे फोटो व व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसह नेहमीच शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी अक्षयाच्या मंगळागौरीच्या फोटो व व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अशातच अक्षयाने इंस्टाग्राम वरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयाला तिच्या पतीने एक महागडा फोन गिफ्ट केला असल्याची पोस्ट तिने शेअर केली आहे.
अक्षयाने नव्या फोनसह एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हार्दिकने अक्षयाला ‘आयफोन 15 प्रो मॅक्स’ हा महागडा फोन गिफ्ट केला आहे. या पोस्टमध्ये आयफोनबरोबरचे फोटो शेअर करत अक्षया म्हणाली आहे की, “उठले तोच आयफोन 15 प्रो मॅक्स”शेजारी, तळटीप : फक्त आयफोन लव्हरच 1TB चं महत्व जाणून घेऊ शकतात”. अक्षयाला हार्दिकने दिलेलं हे सरप्राईज आवडलं असून तिने आयफोन गिफ्ट केल्यामुळे हार्दिकचे आभार मानले आहेत. अक्षयाच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अक्षया व हार्दिक यांच्यात असलेलं बॉण्डिंग नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला प्रेक्षकही आतुर आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनंतर हार्दिक अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकला. तर अक्षया लग्नानंतर अभिनय क्षेत्रात फारशी दिसली नाही. पण चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.