रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या २४व्या वर्षी ‘या’ सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने खरेदी केलं अक्षय कुमारचं घर, फोटो शेअर करत दाखवली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 11, 2024 | 3:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
akshay kumar

वयाच्या २४व्या वर्षी 'या' सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने खरेदी केलं अक्षय कुमारचं घर, फोटो शेअर करत दाखवली झलक

घर ही सर्वसामान्यांपासून ते प्रत्येक कलाकाराचीही गरज आहे. स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत करत असतात. कलाकारांच्या घराचं खासकरून चाहत्यांना आकर्षण असतं. घराचेच नव्हे तर त्यांच्या वौयक्तिक आयुष्याबाबतही जाणून घ्यायला चाहत्यांना आवडत. अशातच एका अभिनेत्याच्या घराविषयी सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. हा अभिनेता म्हणे अक्षय कुमार. लोकप्रिय कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. (Akshay Kumar House)

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी चांदणी भाभदा हिने स्वतःचं हक्काचं मुंबईत घर घेतलं आहे. सोशल मीडियावर असंख्य कंटेंट क्रिएटर्स आहेत. पण काही कंटेंट क्रिएटर्सनी त्यांच्या वेगळ्या कला- कौशल्याने नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींचीही मनं जिंकली आहे. सोशल मीडियावर चांदनी मिमिक या नावाने ती विशेष लोकप्रिय आहे. चांदनी आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. आणि हे पाहून स्वतः आलियानेही तिचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “अफेअरचं प्लॅनिंग होतं पण…”, रंजना यांनी दिलेला सल्ला रवींद्र महाजनींनी नाकारला, बायकोने केला खुलासा, म्हणाल्या…

View this post on Instagram

A post shared by Chandni Bhabhda ???? (@chandnimimic)

चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा अंधेरीतला फ्लॅट खरेदी केला आहे. गृहप्रवेश करतानाचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये चांदनी पूजा करताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये डोक्यावर कलश घेऊन गृहप्रवेश करताना दिसत आहे. हे गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत तिने, “वयाच्या २५ वर्षांच्या आधी घर खरेदी केलं. घराचा ईएमआय भरत आहे.” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – “थकवा जाणवला, चेहऱ्याला मुंग्या आल्या अन्…”, श्रेयस तळपदेने सांगितलं हृदयविकाराचा झटका येण्याआधी नेमकं काय घडलं होतं?

वयाच्या २४व्या वर्षी चांदनीने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे कलाकार मंडळींसह, प्रेक्षकांनीही तिच्यावर भरभरुन कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

Tags: akshay kumar housebollywood gossipchandani bhabhda housechandani bhabhda new homeentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aishwarya Narkar And Avinash Narkar

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या नव्वदीतल्या फोटोने वेधलं लक्ष, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले, "आता खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.