अभिनेत्री वैदेही परशुरामीने बऱ्याच चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये कायमच सोडली. चित्रपटांबरोबरच ती तिच्या मोहक फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. वैदेहीने मोठ्या पडद्यावरून चाहत्यांच्या मनात कायमच घर केलं. शिवाय ती तिच्या सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात येत असते.(Vaidehi Parshurami Akash Thosar)
पहा वैदेहीच्या फोटोवर आकाशने काय केलीय कमेंट (Vaidehi Parshurami Akash Thosar)
अशातच वैदेहीने साडीवरील एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांची खास पसंती मिळवलीय. मात्र या व्हिडीओवरील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैदेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओवरील अभिनेता आकाश ठोसरची कमेंट लक्षवेधी ठरतेय.
वैदेहीने शेअर केलेला या फोटोत तिचा साडीवरील साधाभोळा लूक पाहायला मिळतोय. यांत वैदेहीचा डिसेंट आणि मोहक अंदाज पाहायला मिळतोय. वैदेहीने हे साडी नेसून केलेलं फोटोशूट एका ज्वेलरी ब्रँडसाठी केलं आहे. वैदेहीच्या या फोटोवरील अभिनेता आकाश ठोसरने केलेली कमेंट लक्षवेधी ठरतेय. वैदेहीच्या या फोटोवर आकाशने हार्ट ईमोजी शेअर केली आहे. आकाशच्या या कमेंटवर वैदेहीने पुन्हा कमेंट करत त्यालाही हार्ट ईमोजी पाठवलीय. एफयु या चित्रपटादरम्यान वैदेही आणि आकाशने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासून त्यांच्यात खूप चांगलं बॉण्डही झालं आहे. कलाकारांसोबत अनेक चाहत्यांनाही वैदेहीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.
हे देखील वाचा – केसात गजरा,नाकात नथ,सईच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ
दरम्यान महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्याला ही आकाश आणि वैदेहीने हजेरी लावली होती. त्यावेळी इट्स मज्जा ला दिलेल्या मुलाखतीत आकाश आणि वैदेहीने एकमेकांसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी गमती जमतीत अशी म्हटलं की, कोणी दिग्दर्शक आम्हाला पाहात असेल तर बघा आमची जोडी छान दिसतेय.(Vaidehi Parshurami Akash Thosar)
त्यामुळे तुम्ही आमच्याबाबत विचार करु शकता. तसेच वैदेही आणि आकाशने म्हटले आहे की, जॉनर कोणताही असो फक्त एकत्र काम करायला मिळणं आमच्यासाठी महत्वाच आहे. आता वैदेही आणि आकाश पुन्हा कोणत्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार हे पाहणं रंजक ठरेल.