तर प्रेक्षकांसाठी अजिंक्य ने नुकतीच एक महत्वाची आणि आनंदची घोषणा केली आहे. अजिंक्यची प्रमुख भूमिका असलेला ‘सरी’ हा चित्रपट ५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती अजिंक्यने त्याच्या ऑफिशीयल इंस्टाग्राम अकाउंट वरून दिलीये.(Ajinkya Raut New Movie)

‘आयुष्य हे वेगवेगळ्या आश्चर्याने भरलेले असते’ अशी चित्रपटाची टॅगलाईन पोस्टर वर दिसत आहे. अजिंक्य सोबतच या चित्रपटात अभिनेत्री श्रुतिका श्रोर्ती, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता पंकज विष्णू, अभिनेत्री केतकी कुलकर्णी हे कलाकार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखक, दिगदर्शक आणि निर्माता अशोक हे आहेत.

प्रेमाविषयी असणार हे कथानक नक्की काय असणार हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे तसेच या कलाकारांसोबत आणखी कोणते कलाकार या चित्रपटात असणार हे जाणून घेणं देखील रंजक ठरणार आहे.
या आधी अजिंक्य ने साकारलेली मन उडू उडू मालिकेतील इंद्रा हि भूमिका आणि इंद्रदिप म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्यची जोडी हि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.(Ajinkya Raut New Movie)