“नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्यसरकारने…” अभिनेता संदीप पाठकने मानले सरकारचे आभार

Sandeep Pathak post on theaters
Sandeep Pathak post on theaters

मराठी नाट्यक्षेत्र दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. अनेक नाटकं कलाकारांकडून सादर केली जात आहेत. प्रेक्षकांच्या आशीर्वादनाने आणि कलाकारांच्या मेहनतीने बहरत चालेल्या नाट्यकलेला सरकारचा हातभार लागला आहे त्यामुळे अभिनेता संदीप पाठकने ट्विट करत सरकारचे आभार मानले आहेत. काही कलाकारांनी या आधी नाट्यगृहाच्या दुरुस्ती बाबत, स्वछ्तेबाबत तरतूद करण्याची सरकारकडे मागणी केली होती. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नाटकं पाहण्यासाठी येतो पण नाट्यगृहाची बिघडलेली अवस्था बघून प्रेक्षकांचा हिरमुस होतो.(Sandeep Pathak post on theaters)

अशातच महाराष्ट्र सरकार ने सादर केलेल्या बजेट मध्ये सांस्कृतिक विभागासाठी १०८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या घोषणेमुळे नाट्यगृह कर्मचारी आणि कलाकार त्यासोबाबतच नाट्यप्रेमी देखील सुखावताना दिसत आहेत. या घोषणे नंतर अभिनेता संदीप पाठकने नाट्यगृहाचा फोटो पोस्ट करत “नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्यसरकारने ५० कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा सर्व कलाकारांची मागणी होती की नाट्यगृहांची चांगली देखभाल झाली पाहिजे, कारण प्रेक्षक ४०० रूपये खर्च करतो. आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार 👏 #नाट्यगृह #maharashtrabudget2023” असं कॅप्शन दिलं आहे.

सरकारचे आभार मानत संदीप ने केलेल्या या पोस्ट वर चाहत्यांनी हि भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तर संदीपने सर्व कलाकारांनी पूर्वी पोआसून केलेली नाट्यगृह सुधारण्याची मागणी आता पूर्ण होईल अशा आशा संदीपने या पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे. ४०० रुपये खर्च करून येणाऱ्या प्रेक्षकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हि कोणत्याही कलाकाराची प्रामाणिक इच्छा असते.(Sandeep Pathak post on theaters)

====

हे देखील वाचा – ५ मे पासून बरसणार प्रेमाच्या ‘सरी’ अभिनेता अजिंक्य राऊतची नव्या चित्रपटाची घोषणा

====

नाट्यगृहाची ढासळली अवस्था आता सुधारणार का आणि नाटक पाहण्यासाठी उत्सुक असणारा प्रेक्षकवर्ग या गोष्टीमुळे अजून समृद्ध होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.रंगमंचावर येणार प्रत्येक नाटक हे प्रेक्षकांना प्रेरित करत असत. नाटकाचे वेगवेगळे विषय शेवट पर्यंत प्रेक्षकांना खुरचूवार खिळवून ठेवतात. सरकारच्या या निर्णयाने नाट्यगृह आता आणखी चांगल्या पद्धतीत प्रेक्षकांच्या सोयीसाठी उपलब्ध होतील अशी अशा रंगकर्मीयांना आहे. या निर्णया मुले कलाकारांना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजून बळ, प्रेरणा मिळेल एवढं नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Gaurav More Sudesh Bhosle
Read More

सुदेश भोसलेंसोबत थिरकला गौरव मोरे
डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता गौरव मोरे घराघरात पोहोचला.त्याने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे.…
post office ughad ahe wrap up
Read More

‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ मालिकेची wrapup party दणक्यात साजरी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमानंतर पोस्ट ऑफिस उघड आहे या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर चांगलाच कल्ला केला. गेल्या गेल्या…
Sankarshan Karhade Troll
Read More

नारळ वाढवताना बूट न काढल्यामुळे संकर्षण ट्रोल पण सामंजस्याने दिलं ट्रॉलिंगला उत्तर

सध्याच्या परिस्थतीत कलाकार जेवढा रुपरी पडद्यावर जेवढा गाजतो कधी कधी लहान गोष्टींवरून ट्रॉल ही केला जातो. कधी या…
siddharth jadhav emotional post
Read More

‘भारावलेल्या डोळ्यांनी त्यांनी…’ असे म्हणत सिद्धार्थ जाधवची भावुक पोस्ट

असा नट होणे नाही असे म्हणणाऱ्या सिनेअभिनेते अशोक सराफांच्या व्हिडिओचं करावं तेवढं कौतुक कमीच. झी चित्र गौरव कार्यक्रमात…
amol kolhe challenge
Read More

पंचेचाळीस मिनिटात १०८ सूर्यनमस्कार,कोल्हेंचं स्वतःला चॅलेंज

ऐतिहासिक चित्रपट वा मालिका म्हटलं की आधी नाव सुचत ते म्हणजे अभिनेते अमोल कोल्हे यांचं. ऐतिहासिक भूमिका अगदी…
Chetna Bhat Mandar Cholkar
Read More

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या मंचावर MHJ च्या जावयाची धमाल.. पतीच्या उपस्थतीने अभिनेत्री चेतना भट भावुक

काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक…