रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अजय देवगणचा अंगावर काटा आणणारा ‘मैदान’चा ट्रेलर प्रदर्शित, जबरदस्त संवादांनी वेधलं लक्ष

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 7, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maidaan Trailer

Maidaan Trailer

अनेक खेळाडू, राजकारणी, कलाकार किंवा समाजात घडलेली एखादी महत्वाची घटना याबाबत माहिती पसरवण्यास चित्रपट या माध्यमाचा प्रकर्षाने वापर केला जातो. मनोरंजन विश्वात अनेक कलाकार, खेळाडू यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या असाच एका खेळाडूच्या आयुष्यावर येणाऱ्या आगामी बायोपिकची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ऑलम्पिक फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदा भारताला स्थान मिळवून देणारे भारतीय फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारित ‘मैदान’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच लाँच करण्यात आला आहे. (Maidaan Trailer)

कोच रहीम यांनी शिक्षकाची नोकरी करत असताना फुटबॉलवरच्या प्रेमापोटी या खेळात उतरण्याचे ठरवले. पुढे या क्षेत्रात मजबुतीने पाऊल टाकल्यानंतर रहीम यांनी भारताची सगळ्यात मजबूत फुटबॉल टीम तयार करण्याचे ठरवले आणि त्यांनी अशी एक टीम तयारही केली. रहीम आणि त्यांच्या या संघाच्या संघर्षाची कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. ‘मैदान’ या चित्रपटात दिग्दर्शक, निर्मात्यांनी ही संघर्ष गाथा मांडण्याचे धाडस करत या चित्रपटासाठी तगडी स्टारकास्ट देखील निवडली आहे.

आणखी वाचा- कर्जाचा डोंगर, घरात लाईटही नाही, लोकांच्या वाईट नजरा अन्…; तेजस्विनी पंडितलाही चुकला नाही ‘वनवास’, सांगितलेलं सत्य

‘मैदान’ या चित्रपटात कोच रहीम यांची भूमिका बॉलीवूडमध्ये दमदार भूमिका निभावणारा अभिनेता अजय देवगण याने साकारली आहे. ट्रेलर मधील अजय देवगणच्या लुक आणि अभिनयाचं सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रेलरमधील अजय देवगणच्या करारी संवादांनी अंगावर शहारे येतात. तसेच भारताला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा अभिनय देखील रोमांचकारी वाटतो. भारतात फुटबॉल या खेळामधील राजकारण, टीम बांधणी करताना रहीम यांच्या वाटेत आलेल्या अडचणी यावर देखील प्रकर्षाने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. (Maidaan Trailer)

आणखी वाचा- Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालावे?, पण चुकूनही ‘या’ रंगाचे कपडे घालून घराबाहेर पडू नका कारण…

भारताला आशियाई स्पर्धेत पोहचवणाऱ्या रहीम यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत ही माहिती या चित्रपटातून प्रेक्षकपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. ‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगणसह अभिनेते बोमन इराणी, जॉनी लिवर, गजराव राव यांसह अनेक नवीन कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री प्रियामणी, कीर्ती सुरेश या देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. येत्या ‘ईद’ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: ajay devganbollywood moviemaidaan
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Karan kundra viral video

सुप्रसिद्ध अभिनेत्याची महागडी नवी कोरी कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना, म्हणाला, "कृपया असं करु नका कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.