मंडळी चित्रपट म्हणलं की कोणत्याही कलाकाराला एक गोष्ट कधी ना कधी करावी लागते ती म्हणजे स्टंट्स. कधी कथेनुसार करावी लागते तर कधी एखाद्या कलाकार सोबत दुर्दैवाने ती गोष्ट घडते आणि कलाकाराचं सारं आयुष्य बदलून जात. अशाच एका दुर्दैव्य अपघाडाची शिकार झाली होती अभिनेत्री ऐश्वर्या राय. आणि त्या अपघातानंतर असं काहीस घडलं ज्यामुळे ती गोष्ट आज अजरामर झाली.(Aishwarya Rai Accident Story)

घडलं असं की राजकुमार संतोषी यांच्या खाकी या चित्रपटाच्या शूटिंग वेळी ऐश्वर्या एका उंच कड्याच्या शेजारी खुर्ची मांडून बसली होती. तेव्हा गाडी रिव्हर्स घेताना ड्राइवरचा ताबा सुटला आणि ड्राइवर ने थेट जाऊन ऐश्वर्याला धडक दिली आणि मागच्या खोल दरीत जाऊन ऐश्वर्या पडली क्षणात असं काहीस झालं कि तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात धस्स झालं. शूटिंग दरम्यान अक्षय कुमार ही तिथे उपस्थति होता. त्यावेळी सगळ्यांच्या मदतीने त्याने तिला त्या दरीतून बाहेर काढलं. त्या अपघातात ऐश्वर्या अतिशय जखमी झाली होती. त्यानंतर तिला सक्तीची बेड रेस्ट सांगण्यात आली आणि काही मुख्य चित्रपटांना ती मुकली.
हे देखील वाचा – ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
ऐश्वर्या सुखरूप वाचली आणि..(Aishwarya Rai Accident Story)
सुदैवाने ऐश्वर्यात्या अपघातातून सुखरूप बरी झाली आणि पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली. अपघात घडण दुर्दैवच पण ऐश्वर्या प्रसिद्धीच्या त्या वळणावर होती जिथे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, प्रार्थनेमुळे ती अपघातातून ऐश्वर्या बरी झालीच पण तिच्या प्रसिद्धीमुळे ज्या ठिकाणी तिचा अपघात झाला त्या ठिकाणाला आजही ऐश्वर्या पॉईंट म्हणून ओळखलं जात. अपघात झालेल्या ठिकाणाला एखाद्या अभिनेत्रीच्या नावाने ओळखलं जाणं हे देखील कुतुहलाच आहे.

स्वतःच्या आईने लिहिलेल्या दिल का रिश्ता या चित्रपटात पहिल्यांदा ऐश्वर्या ने काम केलं होत. पुढे १९९४ मध्ये मिस वर्ल्ड हा ‘किताब पटकवल्यानंतर एका पाठोपाठ एक एक येणारे ऐश्वर्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजन बाबतीचा एक अविभाज्य घटक होऊन गेले.फक्त हिंदी मधेच नाही तर इतर ५ भाषांमध्ये आपल्या कामाचा ठसा ऐश्वर्याने उमटवला. प्रसिद्ध दिगदर्शक मणी रत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून ऐश्वर्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकलं.
हे देखील वाचा – आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
ऐश्वर्या ने साकारलेल्या चित्रपटांपैकी अजरामर झालेलं पात्र म्हणजे देवदास या चित्रपटातील ‘पारो’. संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी अशी तगडी स्टार कास्ट होती. अनेक पुरस्कारांचा मान या चित्रपटाने पटकावला होता. रोमँटिक चित्रपटतील ऐश्वर्याच्या बहुतांश भूमिका चांगल्याच गाजल्या. इंडस्ट्रीत काम करताना कुठेही मिस वर्ल्ड असल्याचा माज न बाळगता काम करणं हा ऐश्वर्याचा विशष गुण असल्याचं ललिता ताम्हणे यांनी त्यांच्या चंदेरी सोनेरी या पुस्तकात सांगितलं आहे.(Aishwarya Rai Accident Story)