प्रेक्षकांची लाडकी कलरफुल अशी अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बऱ्याच दिवसांपासून पूजाच्या लग्नाची सोशल मिडियावर धामधूम सुरु होती. पूजा सिद्धेश चव्हाणचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला आहे. जवळचे नातेवाईक, कलाकार मंडळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेशचा विवाहसोहळा पार पडला. पूजा सावंतने केलेल्या बॉलिवूड स्टाईल लग्नाने साऱ्यांची मन जिंकली. दरम्यान अभिनेत्रीने मराठमोळी परंपराही जपलेली पाहायला मिळाली. (Pooja Sawant Sister)
पूजा व सिद्धेशच्या लग्नात तिची बहीण रुचिरा भाव खाऊन गेली. करवली म्हणून बहिणीच्या लग्नात तिने खूप मिरवलं. तसेच ताईच्या लग्नासाठी रुचिराने जबाबदारीही अत्यंत उत्तम पद्धतीने निभावली आहे. बहिणीच्या लग्नसोहळ्याला रुचिराची धावपळ प्रत्येक व्हिडीओमधून पाहायला मिळत होती. बहिणीबरोबर खूप धमाल, मस्ती करत तसेच हळदी समारंभात दोघींनी एकत्र डान्स करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावरुन दोघी बहिणींमधील बॉण्डिंग खूप खास असल्याचं कळालं.

आता बहिणीची म्हणजेच पूजाची सासरी पाठवणी केल्यानंतर रुचिरा ताईला मिस करत असल्याचं समोर आलं आहे. मिस यु असं कॅप्शन देत तिने पूजाचा लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. पूजा व तिची बहीण यांच्यात खास बॉण्डिंग आहे. पूजाला हळद लावतानाही दोघी बहिणींना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. हळद लावताना दोघींनाही रडू आवरेना झालेलं पाहायला मिळालं. तर लग्नाच्या आदल्या दिवशी दोघी बहिणी मध्यरात्री मॅगी खातानाही दिसल्या. याची पोस्ट त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केली होती.
थाटामाटात साजरी झालेल्या या पूजाच्या हळदी समारंभात तिच्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक अंदाजही साऱ्यांच्या पसंतीस पडला. तर लग्नातील पूजाच्या पारंपरिक टच असलेल्या मॉडर्न अंदाजानं साऱ्यांना भुरळ घातली आहे. भरजरी साडीमध्ये या नववधूचं सौंदर्य खुलून आलेलं पाहायला मिळालं. तर सिद्धेश कुर्ता व पायजमा व त्यावर घेतलेली नक्षीदार शाल असा वेस्टर्न अंदाज केलेला पाहायला मिळाला.