बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नागपूरच्या व्हायरल डॉली चहावाल्याकडे जाऊन चहा प्यायले Bill Gates, पण घडलं भलतंच, चहावाल्याने ओळखलंही नाही अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 1, 2024 | 1:44 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Dolly chaiwala on bill gates

Video : नागपूरच्या व्हायरल डॉली चहावाल्याकडे जाऊन चहा प्यायले Bill Gates, पण घडलं भलतंच, चहावाल्याने ओळखलंही नाही अन्..

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर सर्वत्र ‘डॉली चहावाला’ची चर्चा सुरू आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे सह-संस्थापक व जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका चहावाल्याचा एक व्हिडीओ शेअर केला  आहे. या व्हिडीओमध्ये इंटरनेटवरील प्रसिद्ध ‘डॉली चहावाला’ दिसत आहे. डॉली हा त्याच्या चहा बनवण्याच्या शैलीमुळे अधिक प्रसिद्ध आहे. याच पद्धतीने ‘डॉली चहावल्या’ने बिल गेट्स यांना चहा पाजला आहे. पण आता ‘डॉली चहावाला’ बिल  गेट्स यांना नेमका कसं भेटला? दोघांची ओळख कशी झाली? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. (Dolly chaiwala on bill gates)

बिल गेट्स यांनी डॉली चहावाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “भारतात फिरताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नावीन्य दिसून येईल. साधा चहा बनवण्यामध्येही नावीन्य आहे!”, असे लिहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण होणार आई, ‘या’ वयात गरोदर राहण्यासाठी ‘हे’ उपाय करणं ठरेल फायदेशीर, महिलांचा त्रासही होईल कमी

View this post on Instagram

A post shared by Bill Gates (@thisisbillgates)

याबद्दल चहा विक्रेत्याला बिल गेट्स यांच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “ते कोण आहेत याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती. मला वाटलं फक्त परदेशी व्यक्ती आहेत असे समजून  मी त्यांना चहा दिला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नागपूरला आलो तेव्हा मला समजलं की ते नक्की कोण आहेत. आम्ही एकमेकांशी अजिबात बोललो नाही. ते माझ्या शेजारीच उभे होते आणि मी माझ्या पद्धतीने चहा बनवत  होतो. मी दाक्षिणात्य चित्रपट पाहतो आणि ते पाहूनच मी असा चहा बनवायला शिकलो. मला वाटतं की मी आज खऱ्या अर्थाने ‘नागपूरचा डॉली चहावाला’ झालो आहे आणि मला खूप अभिमान वाटत आहे. भविष्यात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा देण्याची इच्छा आहे”, असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणची गरोदरपणात अशी काळजी घेत आहे रणवीर सिंह, गर्दीमध्ये अडकल्यानंतर त्याने काय केलं पाहा?, व्हिडीओ व्हायरल

‘डॉली चहावाला’ हा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून चहा विक्रेता आहे. त्यांच्या चहा बनवण्याच्या आगळ्या  वेगळ्या शैलीमुळे तो इंटरनेटवर अधिक प्रसिद्ध झाला आहे. सध्या त्याचे  इन्स्टाग्रामवर 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.   

Tags: Bill gatesdolly chaiwalamicrosoftMicrosoft companyMicrosoft ownerNagpurviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Rihanna net worth and income see the details singer performing in anant ambani radhika marchant wedding

अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात गाणारी रिहाना नेमकी आहे तरी कोण?, जगभरात रंगली चर्चा, तिची एकूण कमाई आहे तब्बल...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.