ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी १५ जुलैला अचानक येऊन धडकली, आणि बातमी ऐकताच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्काच बसला. पुण्यातील घरी त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली. दोन दिवस त्यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत तसाच होता. या सर्व घटनेनंतर महाजनी कुटुंबीय विशेष चर्चेत आले. सोशल मीडियावर रविंद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनीवर असंख्य आरोप केले जात आहेत. नेटकऱ्यांच्या आरोपांना आता गश्मीरने प्रतिउत्तर देणं सुरु केलं आहे. गश्मीरच्या या कठीण काळात अनेक कलाकारांनीही त्याच्या पाठिशी उभं राहत त्याला आधार दिला. (Gashmeer Mahajani Answers to Trollers)
रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली, या बातमीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. अनेक कलाकार मंडळींनी त्यांना श्रद्दांजली वाहिली. अभिनेता गश्मीर महाजनी याने देखील एक फेसबुक पोस्ट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने केलेल्या या पोस्टवर देखील नेटकऱ्यानी त्याला ट्रोल करायचं काही सोडलं नाही. वडिलांच्या मृत्यूला अनेकांनी गश्मीरला गृहीत धरलं असून सोशल मीडियावर अनेक नेटकरी गश्मीरचा राग राग करताना दिसत आहेत.
पाहा गश्मीरने नेटकऱ्याला कसं उत्तर दिलं (Gashmeer Mahajani Answers to Trollers)
गश्मीरने नितीन देसाई यांच्यासाठी लिहिलेल्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय की, “अशीच एक पोस्ट महाजनी सरांवर देखील करायला हवी होती”. नेटकऱ्याच्या या कमेंटवर उत्तर देत गश्मीरने संताप व्यक्त केला आहे. गेला बराच काळ गश्मीर फक्त नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करत होता. आता मात्र त्याने भाष्य करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणं सुरु केलं आहे.

गश्मीरने नेटकऱ्याच्या या कमेंटवर कमेंट करत म्हटलं आहे की, “तुम्ही या आमच्या घरी आमच्या आईला भेटायला. आणि तिला कस वागायचं ते नक्की शिकवा. तुम्ही खूप मोठी माणसं आहात आणि तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळत” असं म्हणत त्याने नेटकऱ्याची चांगलीच कानउघडणी केली आहे.
हे देखील वाचा – “मला लग्न करायचं आहे पण…”, पूजा सावंतचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पैसा कधीही…”
वडिलांच्या मृत्युंनतर गश्मीर स्वतःला सावरू पाहत आहे. सोशल मीडियावरही त्याने बऱ्याच दिवसांनी स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. गश्मीरला ट्रोल करणारे जेवढे आहेत ट्यून आधी त्याचे फॅन फॉलोविंग आहेत. वडिलांच्या मृत्यूची खरी बाजू माहित नसताना ट्रोल करत असल्याने गश्मीरचा संताप वाढलेला पाहायला मिळाला.