गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही जोडी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. आमचं ठरलं म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर अखेर ही जोडी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकली. प्रथमेश मुग्धा यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अत्यंत साधेपणाने उरकलेलेल्या या लग्नात त्यांच्या साधेपणनानेच रंगत आणलेली पाहायला मिळाली. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
डिसेंबर महिन्यात मुग्धाच्या मोठ्या बहिणीचा म्हणजेच मृदुल हिचाही विवाहसोहळा संपन्न झाला. त्यापाठोपाठ मुग्धाने ही लग्नगाठ उरकली. मुग्धा व प्रथमेश यांनी पारंपरिक अंदाजात हा विवाहसोहळा उरकला. त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींचीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोघांनीही अत्यंत साधेपणाने व घरच्या घरीच त्यांचे लग्नापूर्वीचे विधी उरकले. त्यामुळे साऱ्यांच्या नजर त्यांच्या विवाहसोहळ्यात साधेपणाने आकर्षून घेतल्या. ग्रहमख, हळदी, मेहंदीचे सर्व विधी त्यांच्या घरीच कुटुंबियांसह झाले.
लग्नानंतर सध्या मुग्धा तिच्या सासरी चांगलीच रमलेली दिसत आहे. कोकणातल्या घरी त्यांनी लग्नानंतर दत्तजयंतीनिमित्त एकत्र भजनसेवा ही केलेली पाहायला मिळाली. हा तिच्या लग्नानंतरचा पहिला उत्सव होता. याचे अनेक व्हिडीओ मुग्धा, प्रथमेशने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्टही केले होते. मुग्धा व प्रथमेश याच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. दोघांचा गायनाचा प्रवास हा सारेगमप लिटल चॅम्प या कार्यक्रमापासून सुरु झाला. तेव्हापासून ही जोडी गायचे विविध कार्यक्रम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

अशातच मुग्धाने लग्नानंतरचा तिचा नवऱ्याबरोबरच्या पहिल्या एकत्र गायनाच्या मैफिलीची झलक सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली असून दोघंही कामालाही लागले आहेत. ‘लग्नानंतरची पहिली मैफिल, तीही एकत्र’ असं कॅप्शन देत प्रथमेश मुग्धाने त्यांचा एकत्र सेल्फी शेअर केला आहे. पुणे येथे त्यांची ही मैफिल रंगलेली दिसली. यावेळीही दोघांचा साधेपणा कौतुकास्पद होता.