बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : उदयपूरच्या पॅलेसमध्ये पोहोचलं आमिर खानच्या लेकीचं वऱ्हाड, तिथेही अभिनेत्याच्या जावयाचं वर्कआऊट, धमाल-मस्ती अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 6, 2024 | 6:52 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
ira khan and nupur shikhare went to udaipur aamirs daughter shared workout photo from the city

Video : उदयपूरच्या पॅलेसमध्ये पोहोचलं आमिर खानच्या लेकीचं वऱ्हाड, तिथेही अभिनेत्याच्या जावयाचं वर्कआऊट, धमाल-मस्ती अन्…

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नुकतीच ३ (जानेवारी) रोजी बॉयफ्रेंड नूपुरबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला असून घरच्या काही मोजक्या कुटुंबियांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. आयरा आणि नूपुरने नोंदणी पद्धतीने लग्न केले असून येत्या ७ जानेवारीला उदयपूर येथे शाही पद्धतीने त्यांचा पुन्हा एकदा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर १३ जानेवारीला मुंबई मधील जिओ वर्ल्ड येथे त्यांच्या लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळाही पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. (Ira Khan And Nupur Shikhare Wedding)

काल (शुक्रवार ५ जानेवारी) रोजी आयरा खान व नुपूर शिखरे कुटुंबासह उदयपूरला पोहोचले. यावेळी आयरा आणि नुपूर व्यतिरिक्त वधूची आई रीना दत्ता (आमिर खानची माजी पत्नी) आणि कुटुंबातील इतर सदस्य विमानतळावर स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले. आयरा-नूपुर यांच्या शाही लग्नासाठी त्यांच्या मित्रपरिवारानेही  जयपूरमध्ये खास हजेरी लावले आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ आयराने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री मिथिला पालकर हीदेखील नाचताना दिसत आहे.  

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी मराठी कलाकारांची तुफान गर्दी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व शरद पवार यांची विशेष उपस्थिती

आयराने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आयरा व नूपुर हे जयपूरमधील स्थानिक स्त्रियांबरोबर जयपूरमधील लोकनृत्य करतानाचे पाहायला मिळत आहे. तसेच नूपुर व त्याचे काही मीतर गाणी गातानाही दिसत आहेत. त्याचबरोबर आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते जयपूरमधील महालात व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. “आमचे लग्न व्यायामाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही” असं म्हणत तिने हा खास फोटो शेअर केला आहे.  

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – Video : घरच्या अंगणात भजन सुरु असताना बहिणीच्या मुलीला सांभाळताना दिसली जुई गडकरी, म्हणाली, “मावशी ड्युटी अन्…”

दरम्यान, आयरा खानच्या लग्नाचे विधींना उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि १० जानेवारीला त्यांचे रितीरिवाजानुसार शाही लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जानेवारीला मुंबईत त्यांच्या लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक मोठमोठे कलाकार उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आयरा-नूपुर यांच्या लग्नाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.        

Tags: Amir Khan Latest Marathi NewsBollywood Celebrity Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare HaldiIra Khan-Nupur Shikhare Marriage Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare WeddingIra Khan-Nupur Shikhare Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare Wedding PicturesIra Khan-Nupur Shikhare Wedding Videos PhotosKiran Rao Marathi NewsReena Dutt Marathi NewsWho is Nupur Shikhareअमीर खान ताज्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्न बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे फोटोआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाच्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे वेडिंगआयरा खान-नुपूर शिखरे हळदीकिरण राव बातम्याकोण आहे नुपूर शिखरेबॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या मराठी बातम्यारीना दत्त बातम्या
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
mukta barve share video from rikshaw suffer from road issue in Mumbai see details

Video : रिक्षाने प्रवास करताना मुक्ता बर्वेची झाली हालत, नीट बसताही येईना, म्हणाली, “खड्ड्यातून वाट काढत जाणारा रस्ता…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.