Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात असं पाहायला मिळालं की, ‘बिग बॉस’ यांनी मानकाप्याच्या खाणीतून सोन्याची नाणी गोळा करण्याचा टास्क स्पर्धकांना दिला होता. या टास्क दरम्यान टीम बी विजयी ठरली असल्याच पाहायला मिळालं. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात असं चित्र पाहायला मिळालं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. गेल्या आठवड्याभरापासून निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांच्यात होणारे वाद पाहता ते दोघे पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत असे वाटत होते. मात्र, आता हे चित्र काहीस वेगळं असल्याच दिसत आहे.
अखेर अरबाज निक्कीजवळ येताच माफी मागत तिला जवळ घेत असल्याच पाहायला मिळत आहे. निक्की सुरुवातीपासूनच अरबाजची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती मात्र अरबाज तिचं काहीच ऐकून घेत नव्हता आणि घरातील मंडळीही निक्कीला अरबाजपर्यंत पोहोचू देत नव्हती. मात्र अखेर निक्की व अरबाज यांची गाठ पडली असून आता दोघांनी त्यांच्यातील वाद मिटवला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दोघांनी एकत्र येत एकमेकांना जवळ घेतलेलं ही पाहायला मिळालं. निक्की व अरबाजच्या एकत्र येण्यावर आता प्रेक्षक मंडळींनीही कमेंट करायला सुरुवात केली आहे.
प्रेक्षक मंडळींनी टीम बी आणि जान्हवी, वैभव यांना ट्रोल करत शेवटी निक्कीने सगळ्यांचीच मन जिंकली आणि अरबाजचही मन जिंकलं असं म्हणत तिची वाहवा केलेली पाहायला मिळतेय. तर काहींनी निक्की व अरबाजच्या गेम प्लॅनबद्दल नाराजी दाखवत दोघांना ट्रोल केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
“बाकीच्या लोकांसाठी आणि खासकरुन वैभव व जान्हवीसाठी दोन मिनिटची शांतता”, “अरबाज खरंच पायपुसणं आहे हे त्याने दाखवून दिलं”, “जान्हवी व वैभवचं तोंड बघायचंय”, “बाई हा काय नवीन प्रकार. एवढ्या लवकर जुळलं. बी टीम हे पाहिल्यावर उद्या मारतील”, “अरबाज, तू खरंच सिद्ध केलंस की तू दरवाजाच्या पायपुसण्यासारख आहेस. आता निक्की तुला रिमोट कंट्रोलच्या खेळण्यासारखं ऑपरेट करत आहे”, अशा अनेक कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहेत.