शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देवने दिला आई-बाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा म्हणाला,”आई-बाबा दोघेही…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 27, 2023 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajinkkya Deo Get Emotional

Ajinkkya Deo Get Emotional

Ajinkkya Deo Get Emotional: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी मराठी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली.(Ajinkkya Deo Get Emotional)

अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. कधीही बरा न होणाऱ्या या आजाराशी सीमा देव झुंज देत होत्या. २०२०मध्येच सीमा यांन अल्झायमर या आजाराने गाठलं.सीमा देव यांचे पती व जेष्ठ अभिनेते रमेश देव यांनी २०२२ साली जगाचा निरोप घेतला होता. त्या धक्यातून सावरता सावरता सीमा देव यांच्या निधनाने मोठा धक्का दिला.सीमा देव यांच्या अंत्यसंस्कार विधींना अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी उपस्थिती लावली होती. सीमा देव यांच्या विषयी भावना व्यक्त करताना चिन्मयी म्हणाल्या “या आजारामुळे रमेश काका गेल्याचं तरी काकींना कळलं होत की नाही माहित नाही” आणि या वाक्याने सगळ्यांनाच निशब्द केले.

अजिंक्यने दिला सीमा व रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा (Ajinkkya Deo Get Emotional)

सीमा व रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देवनेही एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या कामाचंही सर्वत्र कौतुक होताना दिसलं. परंतु एका पाठोपाठ आई, बाबा दोघांच्याही जाण्याने अजिंक्यवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सीमा देव व रमेश देव यांचे काही फोटोज शेअर केले आहेत.या पोस्टच्या कॅप्शन मध्ये अजिंक्यने लिहलं आहे ,’आई-बाबा दोघेही गेले, राहिल्या फक्त आठवणी.सुंदर गोडं आठवणी.’ कोणत्याही वयात आई-वडिलांचा हात जेव्हा डोक्यावरून जातो. तेव्हा तितकीच पोकळी निर्माण होते. परंतु आठवणीच असतात ज्या या परिस्थितीत माणसाला तारतात.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya R Deo (@ajinkkyadeo)

हे देखील वाचा: Video : आईच्या निधनानंतर अशी झाली आहे अजिंक्य देवची अवस्था, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आता ती नाही आणि…”

सीमा देव यांचे अंत्यविधी पार पडल्यानंतर देखील अजिंक्यने प्रसारमाध्यांसोबत सवांद साधला होता. अजिंक्य म्हणाला,”“तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असाच आमच्या पाठिशी असावा. यापुढे आम्हालाही असंच प्रेम द्या. आई-बाबांनी नेहमीच तुमचं मनोरंजन केलं. त्याचप्रकारे आम्हीही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच मनोरंजन आम्ही करु. तुमचं अधिकाधिक प्रेम आम्हाला लाभो. याक्षणी एवढंच म्हणेन आणि तुम्हा सगळ्यांचे आभार” तसेच सीमा देव यांची धाकटी सून स्मिता देवने देखील सासूबाईंसोबतच्या खास आठवणी शेअर केल्या होत्या.

Tags: ajikknya deoramesh deoseema deo
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Suvrat Joshi Viral Video

Video : परदेशात जाऊन सुव्रत जोशीने खाल्ले किडे, व्हिडिओही केला शेअर, म्हणाला, "किडे खाऊन मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.