Janhvi Killekar Health Update : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नाची वार्ता थेट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. त्यात ‘बिग बॉस मराठी’चा पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हे सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे. सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर रोजी थाटामाटात पार पडला. परंतु या लग्नात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची.
सूरज-संजनाच्या लग्नात जान्हवी किल्लेकर ही सूरजची करवली म्हणून उपस्थित होती. लग्नाच्या प्रत्येक विधीत ती मनापासून सहभागी झाली होती. मेहंदी, हळद ते वरातीपर्यंत जान्हवी सतत दिसत होती. तिच्या नृत्याचे, जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या प्रत्येक लुकचं भरभरुन कौतुकही केलं. मात्र, लग्नसोहळा संपताच जान्हवी किल्लेकर मुंबईत परतली आणि त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. अभिनेत्रीला तब्येत ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ती उपचार घेत आहे. याबाबतची माहिती तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांजवळ शेअर केली आहे.
आणखी वाचा – Video : आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकरच्या लेकाच्या हळदीत मराठी कलाकारांचा तुफान राडा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल
जान्हवीने रुग्णालयातील फोटो शेअर करत “Nazar Is Real” असं कॅप्शन दिलं आहे. ती सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्स करत तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नात धमाल करणाऱ्या जान्हवीची ही अचानक प्रकृती बिघडल्याची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आता अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सर्व चाहत्यांनी म्हटलं आहे.





