शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अपूर्वा नेमळेकर पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 20, 2026 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Mehandi Ceremony

एतशाचा मेहंदी सोहळा

Marathi Actress Mehandi Ceremony : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाईचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार एकापाठोपाठ आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी देताना दिसत आहेत. नुकतीच अपूर्वा नेमळेकर आणि रेवती लेले यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर त्यांच्या विवाहसोहळ्याचे आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता या चर्चेनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या लगीनघाईची बातमी समोर आली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत नूपुरची भूमिका साकारणारी अभिनेत्री एतशा संजगिरी सध्या तिच्या लग्नाच्या तयारीमुळे चर्चेत आली आहे. एतशाचा नुकताच मेहंदी सोहळा उत्साहात पार पडला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मेहंदी सोहळ्याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एतशाने गुलाबी रंगाचा आकर्षक पेहराव परिधान केला असून ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या हातांवर काढलेली नाजूक आणि आकर्षक मेहंदी चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीची लगीनघाई सुरु, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Anant Sawant (@nirmala_arts_)

या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत कुटुंबीयांची उपस्थितीही फोटोंमधून स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे, एतशाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिचे वडील मेहंदी सोहळ्यात आनंदाने नाचताना दिसत आहेत. हा भावनिक आणि आनंददायी क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. एतशाच्या मेहंदी सोहळ्यावर चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली असून तिच्या नव्या आयुष्यासाठी सर्वजण शुभेच्छा देताना दिसत आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, मृतावस्थेत घरातच आढळला मृतदेह, शेजाऱ्यांना कुबट वास आला आणि…

Tags: marathi actressMarathi Actress Mehandi Ceremonymarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Salim Khan Health Update

सलीम खान यांची प्रकृती आता कशी?,सलग चौथ्या दिवशीही ICU मध्ये घेत आहेत उपचार, डॉक्टर म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.