Revati Lele Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक कलाकरांनी आपल्या प्रेमची कबुली देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. नुकतेच अक्षया-विशाल आणि अपूर्व नेमळेकर-तनुज गोवळकर हे लग्नबंधनात अडकले. यांच्या पाठोपाठ आता आणखी एक छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. ‘लग्नाची बेडी’ या मालिकेच्या माध्यमातून रेवती लेले घराघरात पोहोचली. दरम्यान रेवती लवकरच लग्नबंधनात अडकणार असून नुकतेच तिच्या ग्रहमखचे फोटो समोर आले.
अभिनेत्री रेवती लेले लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर हातातील अंगठीचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. मात्र रेवतीने अजूनही तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. तर अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. रेवतीच्या पुण्यातील घरी नुकताच ग्रहमख विधी पार पडला. यासाठी तिने पारंपरिक लूक केला होता. जांभळ्या रंगाची साडी, मुंडावळ्या, गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये रेवती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान तिने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर रेवातीचा होणारा नवरा नेमका कोण आहे? याबद्दल प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. (Revati Lele Wedding)




