मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून देवदत्त नागेला ओळखलं जातं. छोट्या पडद्यावरील ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतून देवदत्तने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. मालिकेत त्याने खंडोबाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. शिवाय, त्याचा दमदार अभिनय व शरीरयष्टी त्याच्या चाहत्यांना विशेष भावली होती. या मालिकेनंतर देवदत्त ‘डॉक्टर डॉन’ व ‘जीव माझा गुंतला’ यांसारख्या अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकला आहे. (Devdatta Nage in upcoming South Film)
केवळ मराठीच नाही, तर बॉलिवूडमध्येही त्याने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. ज्यात ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’, ‘सत्यमेव जयते २’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. नुकतंच तो दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात हनुमंतरायाच्या भूमिकेत दिसला होता. मराठी व बॉलिवूड गाजवल्यानंतर आता देवदत्त दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अशोक गल्लाच्या आगामी तेलुगू चित्रपटात देवदत्त ‘कामसाराजू’ हे महत्वाचे पात्र साकारताना दिसणार आहे. नुकतंच चित्रपटातील देवदत्तचा लूक समोर आला. हातात शस्त्र, गळ्यात रुद्राक्षच्या माळा आणि वाढलेले केस व दाढी या लूकमध्ये तो एकदम रांगडा दिसत आहे.
हे देखील वाचा – फुलांची परडी, लक्षवेधी सजावट अन्…; मॉडर्न अंदाजात पार पडलं ‘बिग बॉस’ फेम सई लोकूरचं डोहाळ जेवण, पाहा फोटो
दरम्यान, देवदत्तची या चित्रपटात नेमकी काय भूमिका असणार आहे, हे समोर आले नाही. पण त्याच्या या लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्याने हा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपण पहिल्या तेलुगू चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे बोलला. तसेच, या चित्रपटाचा टीझर व शीर्षक लवकरच येणार असल्याची माहिती त्याने दिली आहे.
हे देखील वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईचं निधन, फोटो शेअर करत दिली माहिती
देवदत्तचा हा लुक व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी त्याच्या लूकचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर, अभिजीत खांडकेकर, संग्राम समेळ, सुयश टिळक, रसिका वेंगुर्लेकर, काजल काटे यांसारख्या अनेक मराठी कलाकार मंडळींनी देखील देवदत्तचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नाव अदयाप समोर आले नाही. मात्र, लवकरच याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन जंडयाला दिग्दर्शित या चित्रपटात देवदत्तला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे.