Sankarshan Karhade Brother Post : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे याच्या आयुष्यात आज एका अत्यंत आनंदाचा क्षण आला आहे. अधोक्षज आणि त्याच्या पत्नीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून, ही बातमी त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अधोक्षजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गोड बातमीची घोषणा केली आहे. चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अधोक्षजला १० फेब्रुवारीला मुलगा झाला. आणि मुलगा झाल्याच्या एका महिन्याने त्याने ही गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली.
“आमच्या आयुष्यात एका लहानशा पाहुण्याचे आगमन झाले आहे, आम्ही सध्या खूप आनंदी आहोत,” अशी भावना अधोक्षजने व्यक्त केली आहे. “चिरंजीव आले. १० फेब्रुवारी २०२६, आई-बाबांच्या लग्नाच्या ४१व्या वाढदिवशी आमचे आई-बाबा परत आणि चैतालीचे आई-बाबा पहिल्यांदा आजी-आजोबा झाले. चैताली आणि मी आई-बाबा झालो. आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? याची. नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सध्या पाळण्यातलं नाव ‘नारायण’ ठेवलं आहे. शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या! “, असं कॅप्शन देत त्याने इंस्टाग्रामवर ही गुडन्यूज दिली.
आणखी वाचा – “तिची खूप आठवण येते, आठ वर्षांचं रिलेशन…” एक्स पत्नी रिद्धी डोगराच्या आठवणीत राकेश बापट भावुक
गेल्या काही काळापासून अधोक्षज आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकत आहे, आणि आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील या नवीन सुरुवातीमुळे त्याचे चाहतेही तितकेच उत्साहित आहेत. सोशल मीडियावर अधोक्षजच्या पोस्टवर चाहत्यांकडून ‘अभिनंदन’ आणि ‘बाळाला खूप आशीर्वाद’ अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अधोक्षज हा अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. अधोक्षजला मुलगा झाल्यानंतर संकर्षणही आता काका झाला आहे.
सध्या अधोक्षज ‘झी मराठी’ वाहिनीवर कार्यरत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘कमळी’ या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. रोहितचा मोठा भाऊ ऋषी इनामदार ही भूमिका त्या मालिकेत तो साकारत आहे.





