शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिथली परिस्थिती गंभीर…”, विशाखा सुभेदार यांच्या व्हिडीओवर एकनाथ शिंदेची प्रतिकिया, म्हणाले, “त्याला भारतात आणण्याची व्यवस्था…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2026 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
International Flight Cancelled

"तिथली परिस्थिती गंभीर…", विशाखा सुभेदार यांच्या व्हिडीओवर एकनाथ शिंदेची प्रतिकिया, म्हणाले, "त्याला भारतात आणण्याची व्यवस्था…"

International Flight Cancelled : अमेरिका-इस्त्राईल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरही मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आखाती देशांतील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. आणि यांत अनेक भारतीय अडकले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत अभिनेत्री विशाखा सुभेदारचा लेक अभिनय सुभेदारही अडकला आहे. कुवेतमध्ये विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय अडकला असून त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सरकारकडे धाव घेतली होती. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘एबीपी माझा’सोबत साधलेल्या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, “विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे, तीन-चार दिवसांपासून. लंडनला जात होता. परंतु ही सर्व युद्धजन्य परिस्थिती सुरु झाली आणि त्यामुळे तो कुवेतला अडकलेला आहे. आमचे डॉक्टर राहुल, त्यांच्यासोबत बोलले आहेत. जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था होत नाही, आणि तीसुद्धा आम्ही करतोय. तोपर्यंत त्यांची तिकडे सुरक्षित राहण्याची व्यवस्था आणि त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्ही घेतोय”.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील अभिनेत्रीला मातृशोक, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती, भावुक होत म्हणाली, “दोघेही असेच गेले…”

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

विशाखा सुभेदार सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं की, “नमस्कार. मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र कुवेतमध्ये lay over असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. गेले चार दिवस एअर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहित आहे विमानं रद्द करण्यात आली आहे. माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे, हे आपण बातम्यांमधून पाहतोय”.

आणखी वाचा – घटस्फोटादरम्यान लेकानेही सोडली बापाची साथ, थलापति विजयचे विवाहबाह्य संबंध खटकले, पत्नीचे गंभीर आरोप

पुढे त्या म्हणाल्या, “तो स्वत: तिथे अनुभवतोय. तिथे हल्ले होत आहेत. एअरलाईनने आत्ता त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. इंडियन अँबेसीने व्यवस्था केली आहे. पण आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्येही भारतीय अडकलेत त्यांना परत आणावं. ही माझी कळकळीची विनंती आहे. अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची मायदेशी वाट बघत आहे. लवकरात लवकर त्यांना परत आणा, त्यांची काळजी घ्या एवढीच विनंती आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा”.

Tags: eknath shindeInternational Flight cancelledvishakha subhedar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Mandana Karimi on leaving India

"भारताने माझा विश्वासघात केला", इराणमधून आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला सोडायचाय देश, म्हणाली, "इथे सुरक्षित नाही"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.