शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन्ही पायांना पोलिओ, दुःख -संकटांचा सामना आणि…; वीणा जामकरची सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची भावुक पोस्ट, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2025 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Veena Jamkar News

दोन्ही पायांना पोलिओ, दुःख -संकटांचा सामना आणि…; वीणा जामकरची सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची भावुक पोस्ट, म्हणाली…

Veena Jamkar News : सध्या ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेत्री वीणा जामकरने साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पहायला मिळत आहे. कोकणी जीवनशैलीवर आधारित असलेल्या या सिनेमात वीणाची भूमिका लक्षवेधी ठरली. वीणा अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच वीणाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. वीणाने शेअर केलेली ही पोस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कलमकर यांच्यासाठी आहे.

वीणाने पोस्ट शेअर करत भावना मांडत असं म्हटलं की, “तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका, लिडरशीप या पलिकडे आहेत तुझ्यातल्या संवेदना… ज्या लाभतात अर्थातच दुःख -संकटांचा सामना करुनच. आणि या संवेदना जोपासायच्या की प्रवाह – पतीत होऊन सोडून द्यायच्या याची पण निवडच करावी लागते! तू ती केलीस. तू ‘सिनेमा दिग्दर्शक’ म्हणून खास आहेस. दोन्ही पायांना पोलिओ असलेली व्यक्ती सिनेमा दिग्दर्शक कशी बरं होऊ शकते असं मलाही वाटलंच होतं तुझ्याकडे बघून. पण मी वेळोवेळी अनुभवलं ते तुझ्यात नसलेलं मानसिक अपंगत्व, जे आमच्यापैकी बहुतेक जणांकडे थोडं फार आहेच”.

आणखी वाचा – राणी मुखर्जीला अधिक रोख रक्कम तर शाहरुख खानला कमी, राष्ट्रीय पुरस्कारावेळी असं का घडलं?, जाणून घ्या…

पुढे तिने लिहिलं, “कल्पना करुनही समजू शकत नाही इतक्या अवहेलनेला सामोरं जाऊनही तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलतं. अन्यायग्रस्त माणसाचं रडणं आणि त्या रडण्याचंच भांडवल करणं हे तुझ्याकडून अपेक्षित असलेले गुण तुझ्या आसपासही फिरकत नाहीत. आणि तिथेच तू खूप मोठा होतोस. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चं बॉक्स ऑफिस वर कलेक्शन किती यावर तुझं यश ठरत नाही. तू तेव्हाच सगळं जिंकलंस जेव्हा पहिल्यांदा हातातली काठी बाजूला सारून, तू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर विराजमान झालास. काय वाटलं असेल तेव्हा तुला?”.

आणखी वाचा – 71st national awards : शाहरुख खान आणि रानी मुखर्जीचा पहिला नॅशनल अवॉर्ड, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

शेवटी तिने कौतुक करत म्हटलं, “लाडक्या, Thank You Very Much. तू तुझ्याच अस्तित्वाला अर्थ दिलास त्यासाठी! नाहीतर माझ्यासारख्या अनेकांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुठून बळ मिळालं असतं? तू Super Hit है बॉस”.

Tags: kurla too vengurlamarathi actressVeena Jamkar News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tu maza Kinara Photo

भूषण प्रधानचा ‘तू माझा किनारा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात, मोशन पोस्टरमधील चिमुकलीच्या गोड आवाजानं वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.