परखड, बिनधास्त व्यक्तिमत्वांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात. आपल्या मनाला वाटेल ते कायम करणं, टीका झाली तर दुर्लक्ष करणं आणि आपल्यातील अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जोपासण्यात अभिनेत्री वनिता खरात यशस्वी झाली. कोळीवाड्याची रेखा म्हणून वनिताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.(Vanita Kharat talks obesity)
वनिता हास्यजत्रेच्या मंचावर जेवढी हजरजबाबी आहे तेवढीच ती खऱ्या आयुष्यातही बिनधास्त आहे. तिने हे तिच्या न्यूड फोटोशूटवरून दाखवूनही दिल. वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटवरून चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मात्र या चर्चेला वनिताने वेळोवेळी उत्तर दिल.
लठ्ठपणावर काय म्हणाली वनिता खरात (Vanita Kharat talks obesity)
वनितानं एका मुलाखतीत तिच्या लठ्ठपणावर आणि त्यावर होणाऱ्या टीकेवर परखड भाष्य केलं आहे. वनिता लठ्ठ असली तरी तिने आजवर तिच्या दमदार अभिनयाने हे कुठेच जाणवू दिल नाही. वनिता म्हणाली की, ‘मला लठ्ठपणावरून अनेकदा लोक बोलतात, मी त्याकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ मी लठ्ठपणाला प्रमोट करतेय असं नाहीय. कारण लठ्ठपणा हा वेगवेगळ्या पद्धतीने आलेला असतो. कुणाचे हार्मोन चेंज होऊन लठ्ठपणा येतो, तर कुणाला इतर कोणत्याही कारणामुळे. लठ्ठपणापेक्षा फिट राहणं गरजेचं आहे. कारण एका वयानंतर लठ्ठपणा आपल्यासाठी त्रासदायकही होऊ शकतो.'(Vanita Kharat talks obesity)
वनिता पुढे म्हणाली की, ‘समाजानं एक चौकट बनवून ठेवली. मग बारीक असलेला, अॅब्स असलेला माणूसच सुंदर आहे, ही चौकटच चुकीची आहे. लठ्ठ असणं हे चुकीचं नाहीय. तुमच्या लठ्ठपणामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते चुकीचंच आहे. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून लठ्ठपणा वाईट आहे असं मी म्हणत नाही. दिसणं आणि तुमची बॉडी हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. दिसण आणि फिट राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.’
हे देखील वाचा – हास्य जत्रेतील ‘त्या’ कृत्या साठी समीर चौघुलेंकडून जाहीर माफी
पुढे बोलताना वनिता म्हणाली, ‘मी जाड असली तरी मी फिट आहे. मी जाडी आहे, त्याचा मला कधीच काहीच फरक पडत नाही. मी छान धावू शकते, फिरू शकते, उठू शकते तर मग काय प्रॉब्लेम आहे. मी फिट आहे. जर मी फिट नसते त्यावर मला काम करावं लागलं असतं. अर्थात त्याआधी आपण जाडे आहोत, ही गोष्ट स्वीकारायला हवी,’ अशा शब्दांत वनितानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Vanita Kharat talks obesity)
वनिताने लठ्ठपणावर भाष्य करत टीका करणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. वनिता अभिनयासोबतच तिच्या फोटोशूटमुळे ही नेहमी चर्चेत असते.
