शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2025 | 7:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jyoti chandekar death

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा

Jyoti chandekar death : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याबाबत मोठी दुःखद बातमी समोर आली आहे. आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी ज्योती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण काही समोर आलेले नाही. अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. आतापर्यंत ज्योती यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत.

अभिनयाबरोबरच ज्योती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या हटके रील व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांची डान्स एनर्जी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी होती, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच आघाडीवर असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग या मालिकेत त्या पूर्णा आजी या भूमिकेत कार्यरत होत्या. पूर्णा आजीचं पात्र ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी साकारलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अर्जुन, प्रिया, कल्पना, पूर्णा आजी, अस्मिता अशी मालिकेतील ही सगळीच मंडळी घराघरांत लोकप्रिय आहेत.

आणखी वाचा – “जाडी मारेल याला, किती बारीक आहे हा”, हर्ष लिंबाचियाबरोबर लग्न केल्यानंतर भारती सिंहला मिळालेले टोमणे, नवऱ्याला म्हणाले, “कमावती बायको आहे”

View this post on Instagram

A post shared by jyoti chandekar (@jyoti.chandekar)

ज्योती चांदेकर यांनी आजवर ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag ) या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत होत्या. अशातच आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Tags: Jyoti chandekar death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
jyoti chandekar passed away

“तू फसवलंस…”, पूर्णा आजीच्या निधनाने सायलीला धक्का, तर अर्जुनलाही अश्रू अनावर, म्हणाला, "आमच्यात नाहीस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.