बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तेजस्विनी लोणारीचा शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ संपन्न, होणार शिवसेना नेत्याची सून, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2025 | 11:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tejaswini lonari engagement

तेजस्विनी लोणारीचा शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ संपन्न, होणार शिवसेना नेत्याची सून, फोटो व्हायरल

tejaswini lonari engagement : मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेत्री शिवानी नाईक आणि भाग्य दिले तू मला फेम अभिनेता अमित रेखी यांचा साखरपुडा समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. या कलाकार जोडीने थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली. यापाठोपाठ आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी. तेजस्विनीच्या साखरपुडा समारंभाचे अनेक फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

तेजस्विनी आता शिवसेना युवा प्रमुख समाधान सरवणकर यांची पत्नी होणार आहे. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. तेजस्विनीचा साखरपुडा रविवारी (२६ नोव्हेंबर) थाटामाटात पार पडला आहे. लग्नानंतर अभिनेत्री राजकीय घराण्याची सून होणार आहे. तेजस्विनी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्न करणार आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत.

आणखी वाचा – प्रार्थना बेहेरेला पितृशोक, वडिलांचे अपघातात निधन, भावुक पोस्ट करत म्हणाली, “डोळ्यांतील पाणी…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

साखरपुड्याला तेजस्विनीने पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची डिझायनर साडी, गळ्यात मोठा हार, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा अशा या लूक‌मध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती. तर साखरपुड्याच्या पूजेसाठी तेजस्विनीने पिवळ्या रंगाची काठपदरची साडी आणि त्यावर डिझाइनर ब्लाऊज परिधान केला होता, तिच्या या लूकमध्ये भरजरी दागिन्यांनी भर घातली. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता, सिद्धार्थने तेजस्विनीच्या साखरपुडा समारंभातील फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – सतीश शाह यांच्या अंतिम संस्काराला कलाकार रडले, ऑनस्क्रीन लेकाने दिला खांदा, तर सून पार्थिवासमोर ढसाढसा रडली

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर आता केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे ती घराघरांत पोहोचली. ‘बिग बॉस मराठी’मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

Tags: Engagementmarathi actresstejaswini lonari engagement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
satish shah prayer meet

डोळ्यांत पाणी, थकलेलं शरीर अन्…; सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नीची अशी अवस्था, प्रार्थना सभेचा व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.