अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तब्बूला ओळखले जाते. तब्बूच्या अनेक चित्रपट आजही हिट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. वयाची ५० ओलांडूनही तब्बू अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न का केले नाही? याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो. अशातच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. ज्याचा विपर्यास केला गेला असून त्यावर तब्बूने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसंच अभिनेत्रीच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये तिच्या टीमने स्पष्ट केलं आहे की तब्बूने कधीच असं वक्तव्य केलं नव्हतं. (tabu should apologize for missuse of marriage statement)
आपल्या या निवेदनात तब्बूने स्पष्ट केलं आहे की तिने कधीच मुलाखती किंवा कार्यक्रमांमध्ये अशा पद्धतीचे कमेंट्स केले नव्हते. तब्बूच्या टीमने दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “हे छापणं थांबवा. तब्बूच्या नावाने काही अपमानास्पद आणि खोटी वक्तव्ये सांगणाऱ्या अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडल्स आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, तिने कधीही असं वक्तव्य केलं नाही. प्रेक्षकांची दिशाभूल करणं हे नैतिकतेचं गंभीर उल्लंघन आहे. आम्ही मागणी करतो की, या वेबसाइट्सने ही खोटी वक्तव्ये त्वरित काढून टाकावीत आणि त्यांच्या कृत्यांसाठी औपचारिक माफी मागावी”
आणखी वाचा – “मला तुझ्याशी लग्न करायचंय”, अमृता खानविलकरकडे चाहत्याची अजब मागणी, म्हणाली, “ऑफरबद्दल धन्यवाद पण…”
काही दिवसांपूर्वी तब्बूने लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तब्बूने स्पष्ट केले की, तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांनी तिला काही फरक पडत नाही. ती म्हणाले की, “हे प्रश्न मला सतावत नाहीत आणि अविवाहित किंवा विवाहित असणं हा मुद्दा इतका महत्त्वाचा नसावा की ज्यावर खूप विचार करायला हवा”. हा मुद्दा पुढे नेत तब्बू असंही म्हणाली होती की, “लग्न हा एखाद्याच्या मूल्याचा निकष असू शकत नाही का? या प्रश्नांकडे मी फारसे लक्ष देत नाही आणि यामुळे मला काही फरक पडत नाही”.
तब्बूच्या या विधानाचा अनेकांकडून विपर्यास केला गेला. तिच्या मुख्य विधानाऐवजी “मला लग्नात अजिबात रस नाही. मला फक्त माझ्या बेडवर पुरुष हवा” असं अनेकांकडून प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामुळे आता टीमकडून तब्बूने असं वक्तव्य कधीच कुठे केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, तब्बूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तब्बू सध्या अक्षय कुमारबरोबर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तब्बू ‘भूत बंगला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावलही दिसणार आहेत.