गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : लेकीच्या मेहंदीसोहळ्यात उदय टिकेकरांनी पत्नीसह धरला ठेका, जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल, स्वानंदी झाली भावुक

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 24, 2023 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage Marathi News

लेकीच्या मेहंदीसोहळ्यात उदय टिकेकरांनी पत्नीसह धरला ठेका, जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल, स्वानंदी झाली भावुक

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असताना कलाक्षेत्रातील आणखी एक लोकप्रिय जोडी लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लाडकी कन्या स्वानंदी टिकेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. टिकेकरांच्या घरी लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णीसह लग्नबंधनात अडकणार आहे.:

स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. स्वानंदीचा मेहंदीसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि आता त्यांच्या लग्नाआधीच्या विधींनादेखील सुरुवात झाली आहे. सुंदर,आकर्षक अशी सजावट असलेल्या मंडपात स्वानंदीच्या हातावर नक्षीदार मेहंदी काढण्यात आली. स्वानंदीच्या हातावर आशिषच्या नावाची मेहंदी रंगलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘गुलाबाची कळी हळदीने माखली!’ गौतमीला लागली स्वानंदच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

स्वानंदी व आशिषच्या या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या आई- वडिलांनाही थिरकण्याचा मोह आवरला नाही. उदय टिकेकर व त्यांची पत्नी यांनी लेकीच्या मेहंदी सोहळ्यात धम्माल मस्ती करत डान्स केला. यावेळी अभिनेत्री भावुक झालेली पाहायला मिळाली. मेहंदीसाठी स्वानंदी व आशिष यांनी लाल रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. तर उदय टिकेकर व त्यांच्या पत्नीने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अगदी नाचत, धमाल मस्ती करत आणि थोडंसं भावुक ही होत स्वानंदीचा मेहंदी सोहळा पार पडला.

आणखी वाचा – स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केला पहिला फोटो, म्हणाली “आता आणखी वाट…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियामार्फत दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडादेखील संपन्न झाला होता. अखेरीस त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags: marathi actormarathi actressswanandi tikekarswanandi tikekar fatherswanandi tikekar motherSwanandi Tikekar Weddinguday tikekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Apurva Nemlekar Premachi Goshta

ऑनस्क्रीन लग्नात राडा केल्यानंतर अपूर्वा नेमळेकरचा त्याच लग्नमंडपात धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, "लग्न कोणाचंही असो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.