Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेता पियुष रानडे व सुरुची अडारकर यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. या कलाकार जोडीचे लग्नातील फोटो अचानक समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीही अभिनंदन केलं आहे.
सुरुची व पियुष यांनी गुपचूप लग्नसोहळा उरकल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्या लूकची जोरादार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. शाही थाटामाटात त्यांचा लग्नसमारंभ उरकला असल्याचं समोर आलं आहे. सुरुची अडारकरचं हे पहिलंच लग्न आहे. तर पियुष हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. लग्नसोहळा उरकतात सुरुचीने तिच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने तिच्या लग्नाबाबत व तिच्या नवऱ्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सुरुचीने पियुषबरोबर लग्न झाल्यानंतर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता”. पियुषबरोबर लग्न करण्यामागचं कारणही सुरुचीने सांगितलं. ती म्हणाली, “मी एका चांगल्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे त्यासाठी खूप आनंदी आहे. तो काळजी घेणारा आणि भावनिक आहे. मी स्वतःला खूप नशिबवान व भाग्यवान समजते की, पियुषबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला”.
नातं व लग्नाबाबत सुरुची व पियुषने कोणालाही कळू दिलं नाही. याचबाबत सुरुचीला विचारता तिने यामागचं कारण सांगितलं. “सगळ्या गोष्टी खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. माझं व्यक्तीमत्त्वच तसं आहे. म्हणून आमच्या नात्याबाबतही मी कुठे समजू दिलं नाही. त्याचबरोबर लग्नही अगदी खासगी पद्धतीने कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये केलं” असं ती म्हणाली.