रविवार, एप्रिल 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : “दोन लग्न मोडल्यानंतरही विश्वास कसा ठेवला?”, पियुष रानडेबरोबर लग्न केल्यानंतर सुरुची अडारकर ट्रोल, अभिनेत्यालाही सुनावलं, म्हणाले, “मुर्खपणा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 6, 2023 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

Suruchi Adarkar Piyush Ranade Marriage Marathi News

Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : सिनेसृष्टीत सध्या कलाकारांची लग्न चर्चेत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या कलाकारांनी गुपचूप विवाहसोहळा उरकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांनी लग्न केलं असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.

सुरुची व पियुष यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे. याआधीही पियुषची दोन्ही लग्न असफल ठरली आहेत.

आणखी वाचा – Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : दोन लग्न, घटस्फोट अन्…; पियुष रानडेच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी होत्या मराठी अभिनेत्री, तिसऱ्या लग्नामुळे चर्चांना उधाण

२०१० साली पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्येसह लग्नबंधनात अडकला. त्यांचा संसार दीर्घकाळ टिकला नाही. २०१४ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१६मध्ये त्याने मयुरी वाघसह लगीनगाठ बांधली. मयुरीसह ही त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पियुषने त्याचं तिसरं लग्न उरकलं आहे. अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर त्याने लग्न केले. तिसरं लग्न करताच पियुष विशेष चर्चेत आला आहे. आधीची दोन लग्न असफल ठरल्याने अभिनेत्याने तिसरं लग्न केलं असल्याने तो नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकला आहे.

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

आणखी वाचा – Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; सुरुची अडाकर व पियुष रानडेच्या लग्नाची जोरदार चर्चा, मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच खास

सुरुची व पियुष यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट केली. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने, “अरे हा किती लग्न करणार?” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने, “अरे पण दोन दोन लग्न मोडलेल्या मुलावर विश्वास ठेवून लग्न कशा करतात या मुली” असं म्हटलं आहे. तर सुरुचीला प्रश्न विचारत, “अगं तुला दुसरा कोणी भेटला नाही का लग्न करायला हाच भेटला तुला” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने, “काय पण याचे आधीच दोन लग्न झाले आहेत. काय मूर्खपणा आहे. दोन लग्न मोडल्यानंतर कोण विश्वास कसा ठेवू शकतं?” असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने पियुषवर निशाणा साधत, “अरे हा किती वेळा लग्न करतो?” अशी कमेंट केली आहे.

Tags: marathi actormarathi actressPiyush Ranade and Suruchi Adarkar Weddingpiyush ranade marriagepiyush ranade trollpiyush ranade weddingSuruchi Adarkar Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vishal Kotian Untold Story
Entertainment

विशाल कोटियनचे UNKNOWN FACTS; दगडी चाळीतला मुलगा ते ‘बिग बॉस’चा MASTERMIND

एप्रिल 5, 2026 | 11:00 am
Famous Marathi Actor Son Name Ceremony
Entertainment

मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

एप्रिल 4, 2026 | 1:12 pm
Rashmika and Vijay Devarkonda New Update
Entertainment

रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 4, 2026 | 12:05 pm
Piyush Mishra On Alcoholism
Entertainment

आईला नको नको ते बोलले, महिलांशी अश्लील संवाद केला; दारूच्या नशेत अभिनेत्याच्या आयुष्याची लागलेली वाट, म्हणाले…

एप्रिल 4, 2026 | 11:00 am
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

“आमच्या नात्याबाबत…”, पियुष रानडेबरोबर लग्न करण्याबाबत सुरुची अडाकरचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “तो खूप…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.