Supriya Pilgaonkar Film Career गेला अनेक काळापासून ज्यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं त्या म्हणजे अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर. सुप्रिया पिळगावकर व सचिन पिळगावकर यांनी वैयक्तिरित्या सिनेसृष्टीमध्ये भरघोस यश संपादन केलं आहे. तसेच एक आदर्श जोडी म्हणून देखील त्यांच्या कडे पाहिलं जातं. पंरतु सिनेसृष्टीमध्ये बदलत्या काळानुसार, अफाट स्पर्धेमध्ये टिकून राहणं सोपं नसतं. तरी या जोडीने ही जबाबदारी सक्षमपणे पेलत प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं.(Supriya Pilgaonkar Film Career)
पंरतु हा प्रवास सोपा नव्हता. सुप्रिया यांचं माहेरचं नाव सुप्रिया सबनीस. त्यांनी मधुकर तोरडमल यांच्या नाटकातून पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. सुरुवातीला त्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडत होत्या. सोबतच त्या दूरदर्शनवरील ‘किलबिल’ या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसत होत्या. त्यांच्या या कार्यक्रमाने त्यांना बरीच लोकप्रियता मिळवून दिली होती.
सासूबाईंन मुळे सुप्रिया यांना मिळाला पहिला चित्रपट (Supriya Pilgaonkar Film Career)
‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा सुप्रिया यांचा पहिला चित्रपट. सचिन पिळगावकर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. या चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रिया यांची निवड कशी झाली हा मोठा रंजक किस्सा आहे. याच चित्रपटामुळे सुप्रिया यांचे आई- वडील त्यांच्यावर रागावले होते. या चित्रपटासाठी चक्क सचिन पिळगावकर यांच्या आईने सुप्रिया यांचं नाव सुचवलं होत. त्यांनी स्वतः सुप्रिया यांना या चित्रपटात घेण्यासाठी सचिन यांच्याकडे शब्द टाकला होता. सचिन यांच्या आईने सुप्रिया यांचा ‘किलबिल’ हा कार्यक्रम पाहिला होता आणि सुप्रिया त्यांना आवडल्या होत्या. आईच्या शब्दाखातर सचिन यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मात्र यासाठी सुप्रिया यांच्या आई- वडिलांचा विरोध होता. सुप्रिया यांनी नाटकात काम करणं त्यांना मान्य होतं. मात्र त्यांनी चित्रपटात काम करण्यास आई- वडिलांनी नकार दिला. तेव्हा मोठ्या मुश्किलीने सुप्रिया यांनी आई- वडिलांची समजूत काढली होती. त्यानंतरच त्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ च्या नायिका होऊ शकल्या.

हे देखील वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक
या भूमिकेने त्यांना लोकप्रियता तर दिलीच सोबतच ही भूमिका त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीला वळण देणारी ठरली.चित्रीकरणादरम्यान त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला.२१ डिसेंबर १९८५ साली सुप्रिया आणि सचिन पिळगावकर विवाहबद्ध झाले. त्या दोघांमध्ये ११ वर्षांचं अंतर आहे.’माझा पती करोडपती’ ,’नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवाबनवी’ यांनसारखे अनेक एव्हरग्रीन चित्रपट या जोडीने सिनेसृष्टीला दिले.(supriya pilgaonkar sachin pilgaonkar)