शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोणाला भेटू द्यायचे नाही, खूप निर्बंध होते आणि…; वैयक्तिक आयुष्यातील अडचणीतून अशी बाहेर पडली स्नेहा वाघ, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 8, 2025 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sneha Wagh Marital news

कोणाला भेटू द्यायचे नाही, खूप निर्बंध होते आणि…; वैयक्तिक आयुष्यातील अडचणीतून अशी बाहेर पडली स्नेहा वाघ, म्हणाली…

Sneha Wagh Marital news : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्नेहा वाघ. काही काळापूर्वी स्नेहाने मराठी मालिकाविश्वापासून दूर जात हिंदी मालिकाविश्वाला प्राधान्य दिले. अनेक हिंदी मालिकांमध्ये स्नेहाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मराठीमध्ये स्नेहा शेवटची ‘बिग बॉस’च्या घरात दिसली. व्यावसायिक आयुष्यापेक्षा स्नेहा वाघच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोन लग्न आणि घटस्फोट यादरम्यान स्नेहाने बऱ्याच अडचणींचा सामना केला. मात्र आता स्नेहा वृंदावनच्या वातावरणात रमली आहे. अशातच आता स्नेहाने वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि त्यातच केलेलं शूटिंग या दोन्ही बाजू कशा सांभाळल्या याबाबत भाष्य केलं आहे.

स्नेहाने मज्जा पिंकच्या the healing with vanashree या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी स्नेहासह बऱ्याच गप्पा रंगल्या. यावेळी वनश्री पांडे यांनी स्नेहाला “वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि रोज सुंदर दिसून होणार शूटिंग या दोघांमध्ये तुझी झालेली घालमेल तू कशी संभाळलीस?”, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत स्नेहाने असं म्हटलं की, “spirituality ची सुरुवात तेव्हा झालीच नाही. spirituality ची सुरुवात तर आता झाली. २०१५-१६ पासून सुरुवात झाली. मी म्हटलं तसं तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा असं वाटायचं हेच आयुष्य आहे, असंच जगायचं असतं. हेच करायचं असतं आणि हेच भोगायचं असतं, फक्त आपल्याबरोबर नाहीतर सगळ्यांबरोबर असं होतं. हे असं मला वाटायचं. पण नंतर जेव्हा मी बाहेर पडायला लागले, लोकांशी बोलायला लागले तेव्हा कारण मला कोणाशी बोलू द्यायचे नाही, मला कोणाशी भेटू द्यायचे नाही. त्यावेळी मला खूप निर्बंध लावण्यात आले होते”.

आणखी वाचा – आईला कॅन्सरचे निदान, मालिकेचं शूट आणि…; ‘पारू’ फेम आदित्यने चोखपणे सांभाळल्या जबाबदाऱ्या, पुरस्कार मिळताच भावुक

पुढे ती म्हणाली, “पण नंतर जेव्हा मी लोकांशी, किंवा काही मैत्रिणी अशा झाल्या ज्या मला बोलल्या स्नेहा हे खूप चुकीचं होतंय. तुला कळत नाही आहे का?, तुझ्याबरोबर काय होतंय ते?. तर मी म्हणायचे नाही. त्यांनी मला सांगितलं हे चूक आहे, मला कोणीतरी येऊन सांगावं लागलं की हे चुकीचं आहे. आणि मग मी निर्णय घेतला की, हे चुकीचं आहे तर चुकीचं नाही व्हायला पाहिजे. बरं. कसं असतं ना लहानपण जे असतं, वा आताची जी पिढी आहे १७-१८ वर्षाची ती खूप स्ट्रॉंग आहे. ते पॉवरफुल असतात, पण आपल्यावेळेला तसं काहीच नव्हतं. जर मी तुम्हाला भेटले तर असं व्हायचं हा या एक आहेत. पण आता असं नाही आहे. आता असं आहे की ही स्नेहा आहे. मग तिच्याबद्दल इंस्टाग्राम बघा, गुगल करा, आणि अशाप्रकारे आपण त्या व्यक्तीला जज करण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हा तसं काहीच नव्हतं”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध पंजाबी गायकाचे निधन, अपघाती मृत्यूने चाहते भावुक, १२ दिवसांपासून होता व्हेंटिलेटरवर आणि…

शेवटी तिने म्हटलं, “त्यामुळे तेव्हा जेव्हा कळलं की, अशा सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा मी गुडघ्यावर बसून स्वतःलाच सांगितलं स्नेहा मेंटल स्टेट हा एक प्रकार असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. तू खुश आहे की नाही हेदेखील खूप महत्त्वाचं आहे. कारण माझ्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं जो माझ्या आनंदाचा विचार करेल. माझ्या मेंटल स्टेटची ती काळजी मलाच घ्यावी लागली ना?. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती एखाद्या वाईट परिस्थितीत अडकली आहे तर कुणीही बाहेरची व्यक्ती हात देऊन तिला बाहेर काढणार नाही. तुम्हाला त्याच्यातून स्वतः बाहेर पडावं लागतं. आणि त्यानंतर तर मी अनेक आव्हानांना तोंड दिलं पण आणि त्यातून बाहेर आले ती देवाची कृपा होती”.

Tags: actress personal lifemarathi actresssneha wagh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
women periods problem

मासिक पाळीच्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य?, डॉक्टरांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "साध्या कारणांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.