मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने व सुंदर अशा गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगांवकर. केतकीने तिच्या सुमधुर गाण्यांनी आजवर रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. याशिवाय केतकी उत्तम अभिनेत्री म्हणून सध्या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. केतकी माटेगावकर ही मूळची गायिका आहे पण ‘शाळा’ या चित्रपटाने तिला ब्रेक दिला आणि ती सिमनेसृष्टीत काम करण्यास रुजू झाली. (Ketaki Mategaonkar On Award)
सिनेमात अभिनय करताना केतकीने आपली गायन कलाही जोपासली. आणि ती संगीतकारही बनली आहे. तर केतकीने ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाइमपास’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या ग्लॅमरस लूकमुळेच ती महाराष्ट्रातील असंख्य तरुणांची क्रश बनली आहे. गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबर अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रमही करत असते. तिच्या या कार्यक्रमांना नेहमीच प्रतिसाद मिळतो.
सोशल मीडियावरही केतकी फारच सक्रिय असून तिच्या फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत राहते. बरेचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बरेचदा केतकीने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलेलंही पाहायला मिळत आहे. अशातच केतकीच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट पाहून केतकीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
नुकताच केतकीचा पुरस्कार सोहळा पार पडला. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “‘लोकशाहिर विठ्ठल उमप मृदगंधा पुरस्कार २०२३’ मिळाल्याबद्दल सन्मानित! मा. उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. नीलमताई गोरे ज्यांनी मला लहानपणापासून पाहिले आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून खूप बरं वाटले. लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध अवॉर्डने माझा सन्मान करण्यात आला याचा खूप आनंद आहे” असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.