मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. मालिका, चित्रपटांत काम करत तिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही तिची प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. आपल्या हटके स्टाईलमुळे ती कायम चर्चेत असते. (Sayali Sanjeev Shared Her Nail Art Photo)
अशातच आता ‘झिम्मा-२’ या चित्रपटामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता ‘झिम्मा’ चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने ती सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार विविध शक्कल लढवत असतात. अशातच तिने प्रमोशनसाठी एक नामी शक्कल लढवली आहे.

आणखी वाचा – Video : हटके पोझ, अन्…; अरुण कदमांच्या नातवाचा हटके अंदाज, व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “बॉक्सर भाई…”
सायलीने नेल-आर्ट करत ‘झिम्मा-२’चं प्रमोशन केलं आहे. तिने तिच्या नखांची एक वेगळीच स्टाईल केली आहे. नेलआर्ट करत एका नखावर झिम्मा असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या नखावर २ असं लिहिलं आहे. यावरून ती ‘झिम्मा-२’चं हटके प्रमोशन करताना दिसते. तिने केलेल्या या नेलआर्टमुळे तिची नखं आकर्षक दिसत आहेत. तसेच तिने या नखांना साजेसा असा ड्रेस परिधान केला आहे आणि या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
दरम्यान ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘दाह’, ‘झिम्मा’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच आता तिचा ‘झिम्मा-२’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी तिचे चाहतेदेखील कमालीचे उत्सुक आहेत.