‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे.सारा आणि विकी कौशल हे नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. चित्रपट यशस्वी होण्यासाठी चित्रपटच प्रमोशन महत्वाचं असत.या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. याच प्रमोशन दरम्यान साराला काही प्रश्न विचारण्यात आले,कामासोबतच सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असते.(sara ali khan boyfriend)
सारा आणि क्रिकेटपट्टू शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचसोबत अनेकदा ते दोघे एकत्र पाहायला मिळाले. म्हणूनच साराच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं,यात साराला विचारण्यात आले की, तुझ्या आजीसारखं म्हणजेच शर्मिला टागोर यांच्याप्रमाणे तू सुद्धा क्रिकेटरसोबत लग्न करतेय का? साराची आजी शर्मिला टागोर यांनी क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या सोबत लग्न केलं. त्यामुळे सारा सुद्धा आजीचा वारसा चालवणार का या अर्थाने हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर साराने अगदी स्पष्ट उत्तर देत तिच्या लग्नाबद्दलच्या निर्णयाचा खुलासा केला आहे.
पाहा काय म्हणाली सारा अली खान?(sara ali khan boyfriend)

सारा म्हणाली, माझा जोडीदार क्रिकेटर, अभिनेता, व्यावसायिक पेशाने कोणीही असला तरी मला चालणार आहे.परंतु, त्या व्यक्तीचे मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या विचार माझ्या विचारांशी जुळले पाहिजेत.पेशाने तो कोण असावा या विषयी मला काही वाटत नाही फक्त आमचे विचार जुळणे फार महत्वाचं आहे.(sara ali khan boyfriend)
त्यानंतर सरळ भारतीय क्रिकेट संघातील कोणाला डेट करते आहेस का? असा देखील प्रश्न विचारला गेला.या प्रश्नाचे देखील साराने मनमोकळेपणाने उत्तर दिले. ती म्हणाली,मी या प्रश्नाचे उत्तर अगदी प्रामाणिकपणे देईन, मी अजूनपर्यंत अशा कोणत्याच व्यक्तीला भेटले नाही, ज्याच्या सोबत मी माझं संपूर्ण आयुष्य घालवू शकेन. जरा हटके जरा बचके सारखा जोडीदार मला मिळालं तरी चालेल. असं म्हणत तिने तिच्या आणि शुभमन गिलच्या नात्याविषयी मौन खोलले.
हे देखील वाचा : लग्न कधी करणार? यावर अभिनेता प्रभासने केला मोठा खुलासा