छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनेता अभिनव शुक्ला यांनी नुकतीच गुड न्युज दिली आहे. हे जोडपं ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतं होते तो क्षण आला. रुबीनाने दोन जुळ्या लेकींना जन्म दिला असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. रुबीना-अभिनव यांच्या घरी चुमकल्यांचं आगमन झालं असल्याची आनंदाची बातमी अभिनेत्रीच्या ट्रेनर सोशल मीडियाच्या माध्यामातून पोस्ट शेअर करत दिली.(Rubina dilaik became mother of wins girls)
रुबीना आई होणार या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना जुळी मुलं होणार असल्याचाही खुलासा या अगोदर अभिनेत्रीने केला होता. आता रुबीनाच्या ट्रेनरने पोस्ट शेअर करत रुबीनाने जुळ्या मुलींना जन्म दिला असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. सध्या ही बातमी बरीच व्हायरल होत आहे. रुबीनाच्या फॅनपेजने १६ डिसेंबरला एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये रुबीनाच्या ट्रेनरने केलेली पोस्ट होती. ज्यात स्पष्ट केलं गेलं होतं की रुबीना २ लेकींची आई झाली आहे. मात्र काही काळानंतर त्यांनी ती पोस्ट सोशल मीडियावरुन हटवली गेली.

रुबीनाच्या ट्रेनरने तिच्याबरोबरचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहीली. ज्यात रुबीनाने टी-शर्ट व काळ्या रंगाची शॉर्ट्स पँट घातली होती. डोक्यावर टोपी घालत ती ट्रेनिंगच्या कपड्यात दिसत होती. हा फोटो पोस्ट करत ट्रेनरने, ‘खूप अभिनंदन’ असं पोस्ट केलं होतं.
ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर नेटकऱ्यांनीही या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र आतापर्यंत अभिनेत्रीने किंवा अभिनेत्याने या आनंदाच्या बातमीचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये थोडी नाराजी असलेली पाहायला मिळत आहेत. या जोडप्याच्या चाहत्यांनी कमेंट करत आपली नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली जात आहे.