बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, उत्सुकता वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2025 | 4:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharala tar mag

'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी?, प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स, उत्सुकता वाढली

Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने अव्वल स्थान निर्माण केलं आहे. ही मालिका सुरु झाली तेव्हापासून या मालिकेतील कलाकारांनी रसिकांचं मन जिंकलं. मालिकेतील सगळेच कलाकार मालिकेला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी मालिकेतील अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यांच्या जवळच्या पात्रामध्ये म्हणजेच पूर्णा आजीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. मालिकेतील त्यांचे पात्र अर्ध्यावरच सोडून त्या निघून गेल्या, अर्थात हे दुःख पचवणं कठीण आहे.

ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजी हे पात्र मालिकेत कोण साकारणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागू राहिल्या होत्या. मात्र काही चाहत्यांच्या मते या भूमिकेत कोणीही नको असं मत समोर आलं. तर काहींनी अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींची नावे घेतली. अखेर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार या प्रश्नाला आता स्टार प्रवाह वाहिनीने पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा – Video : कुटुंबाचं पत्र पाहून प्रणित मोरे ढसाढसा रडला आणि…; इतर स्पर्धकांच्याही डोळ्यांत पाणी

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, मालिकेत पूर्णा आजीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही भूमिका नेमकं कोण साकारतंय हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पाठमोऱ्या पूर्णा आजीच्या भूमिकेत समोर आलेल्या व्हिडीओने ही उत्सुकता अधिकच वाढली आहे. “अन्नपूर्णा निवासात पुन्हा एकदा आनंद घेऊन येणार पूर्णाआजी” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ समोर आला आहे. सदर प्रोमोवर आलेल्या कमेंटने मात्र अनेकांच्या नजरा वळविल्या आहेत.

आणखी वाचा – “कोणाच्या बापामध्ये इतकी ताकद नाही”, सेटवर उशिरा पोहोचल्याच्या आरोपावरुन गोविंदा संतापला, म्हणाला, “माझी बदनामी…”

“होणार सून मी या घरची मधली आई आजी”, “रोहिणी हट्टंगडी”, “रोहिणी ताई हट्टंगडी”, “खूप इमोशनल, अंगावर काटा आला असं वाटलं जुनी पूर्णा आजी आली”, “येस रोहिणी हट्टंगडी”, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. अर्थात व्हिडीओवर आलेल्या कमेंटवरुन पूर्णा आजी ही भूमिका रोहिणी हट्टंगडी साकारणार असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता नक्की मालिकेत ही भूमिका कोण साकारणार हे लवकरच समोर येईल.

Tags: jyoti chandekarmarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Dhanteras Puja 2025

धनत्रयोदशीला काय खरेदी करावे?, शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.