हम आपके है कौन या चित्रपटाची बातच वेगळी आहे, एव्हरग्रीन चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट महत्वाचं स्थान बजावतो.इतक्या वर्षानंतर ही तितक्याच आवडीने आणि आपुलकीने प्रेक्षक हा चित्रपट पाहतात.सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या केमिस्ट्रीच प्रेक्षक आजही कौतुक करतात. (Madhuri Dixit Renuka Shahane)
माधुरीचा अभिनय, नृत्यकौशल्य याने तिने प्रेक्षकांचं मन चांगलंच जिंकलं. त्यामुळे माधुरी दीक्षित यांचं नाव निघालं की, हम आपके है कौन या चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. मराठी प्रेक्षक या चित्रपटाकडे ओढला जाण्याचं अजून एक खास कारण म्हणजे या चित्रपटातील मराठी कलाकार. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि रेणुका शहाणे. हे कलाकार या चित्रपटात विशेष भूमिकेत पाहायला मिळाले.
पाहा काय आहे किस्सा ? (Madhuri Dixit Renuka Shahane)
सतत हसरं व्यक्तिमत्व असणाऱ्या रेणुकानी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या भूमिकेने,अभिनयातील सहजतेने त्यांना कायमची ओळख मिळवून दिली. हे असं असताना ती एक लाइफटाईमवाली भूमिका मिळणं फार महत्वाचं आहे. असाच एक किस्सा रेणुका शहाणेंनी सांगितला आहे. या चित्रपटात रेणुकानी माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे.तेव्हा त्या म्हणाल्या की, तीन वेळा माझी स्क्रीन टेस्ट झाली. कारण मुख्य म्हणजे माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका असल्यामुळे त्यांना मी माधुरीपेक्षा मोठी दिसणं आवश्यक होत.(Madhuri Dixit Renuka Shahane)
हे देखील वाचा : रडत रडत सीन शूट केला- लक्ष्या होता म्हणून निभावलं,रेणुकांनी सांगितला किस्सा
दोन भूमिकांच्या पर्सनॅलिटी मध्येच खूप फरक होता.त्या जेव्हा या चित्रपटासाठी भेटायला गेल्या होत्या तेव्हा त्या सलवार कमीज घालून गेल्या होत्या. तेव्हा असं वाटलं होत की ही माधुरीची मोठी बहीण कशी दिसणार? पंरतु चित्रपट झाल्यानंतर या बहिणींच्या जोडीची कमाल सर्वानीच पाहिली.