मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त फोटोशूट्स , रिल्स यांसाठी देखील चर्चेत असतात. या अभिनेत्रींपैकी फोटोज आणि रील्स सोबतच विविध योगासनांसाठी देखील ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सोशल मीडिया वर बऱ्यापैकी सक्रिय असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो, त्या फोटोंचे हटके पोजेस यांमुळे सोशल मीडिया प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. आणि हा चाहता वर्ग नेहमी प्राजक्तच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेम दर्शवत असतो.(Prajaktta Mali Shivpriya Video)

योगासनांचे व्हिडिओ पोस्ट करून फिट राहण्याचा संदेश देणाऱ्या प्राजक्ताने आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय पण या व्हिडिओ मध्ये असणारी योगा टीचर प्राजक्ता नसून तिची भाची शिवप्रिया दिसत आहे. आपल्या बालअदांनी शिवप्रिया योगा करताना दिसत आहे. प्राजक्ताकने शिकवल्या प्रमाणे शिवप्रियाचे हे योगा क्लासेस सुरु आहेत.
पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्राजक्ताने लिहिलंय ” आजचा व्यायाम…
आमच्या दोन्ही चिंट्यांनी योगा शिकावा, निदान आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारी आत्या…”
तर प्राजक्ताच्या या पोस्ट वर अनेक चाहत्यांसोबतच अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील कमेंट करत शिवप्रियाचं कौतुक केलं आहे.