बिग बॉस १६ चे पर्व प्रचंड गाजले. या पर्वातील सगळ्याच कलाकारांनी अगदी कल्ला केलेला पाहायला मिळाला. बिग बॉस च्या या पर्वाचा विजेता पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन ठरला. तर या पर्वाचा उपविजेता शिव ठाकरे ठरला. शिव आणि एमसी स्टॅनची या सीजन मधील जोडी ही चांगलीच चर्चेत राहिली. (MC Stan get attacked)
एमसी स्टॅन ने सिनेविश्वात स्वतःची जागा स्वतःच निर्माण केली.
हिंदी बिग बॉसमुळे एमसी स्टॅनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. खरं तर त्याच्या चाहत्यांमुळेच तो ट्रॉफी जिंकू शकला. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन त्यांच्यापैकीच कोणाला तरी ट्रॉफी मिळणार हे दरम्यान अंदाजावरून वर्तविण्यात येत होत तर या ट्रॉफीचा मानकरी हा एमसी स्टॅन ठरला.
सोशल मीडियावरही एमसी स्टॅनचा स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग आहे त्यामुळे सोशल मीडियावर ही त्याची क्रेझ पाहायला मिळतेय.
====
हे देखील वाचा –“भर उन्हात तो थांबला,आणि..” आकाशचा असा ही एक चाहता
====
नक्की बजरंग दलाचं म्हणणं काय?
तर नुकतीच इंदोर मध्ये असलेल्या एम सी स्टॅनच्या एका लाईव्ह शो मध्ये बजीरंग दलातील काही व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला याची माहिती समोर आली आहे. एमसी स्टॅन नेहमी त्याच्या गाण्यातून अमली पदार्थाचं सेवन करण्याचं प्रोत्साहन देत असतो.
असा त्या व्यक्तींचा दावा आहे. तसेच एमसी स्टॅन त्याच्या गाण्यातून महिलांना शिवीगाळ करत असतो अशी त्यांचं आधी पासून म्हणणं आहे.
झालेल्या हल्ल्यानंतर एम सी स्टॅनच्या चाहत्यांकडून एवढी सुरक्षा असताना ती मानस त्याच्या पर्यंत पोह्चलीच कशी? हा प्रश्न स्टॅनच्या चाहत्यांनी उपस्थति केला आहे. तर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.(MC Stan get attacked)
तर या शो नंतर देखील जगभर स्टॅन चे शो आहेत त्यामुळे बजरंग दल तिथेही पाठलाग करत हा शो बंद पाडणार का? अशी भीती एम सी च्या चाहत्यांमध्ये पसरत आहे. तर पोलीस प्रशासन या घटनेवर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
बिग बॉस ची ट्रॉफी एमसी स्टॅनच्या नावावर झाल्यावर तो भलताच चर्चेत आला. एमसी स्टॅनला अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत.
तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद वाजिद यांनी त्याला एका चित्रपटातील गाणंही ऑफर केल्याची चर्चा आहे. त्यांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर तर या चर्चांना आणखी उधाण आलं.