शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याची जोरदार तयारी, हातावर रंगली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी, नाव आहे…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2025 | 4:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Gaikwad Engagement Date

Prajakta Gaikwad Engagement Date : काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड चर्चेत आली. अभिनेत्रीने अचानक लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने ती चर्चेत आली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने ठरलं असं म्हणत लग्न ठरल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. यावेळी तिने सुपारी फुटल्याचा कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले. अभिनेत्रीचा मराठमोळा पारंपरिक लूक यावेळी लक्षवेधी ठरला. “ठरलं! कुंकवाचा कार्यक्रम”, असं म्हणत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. मात्र यावेळी अभिनेत्रीने ती कोणाबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.

अशातच आता अभिनेत्रीने आता इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या आणखी एका स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने साखरपुड्यानिमित्त हातावर सुंदर अशी मेहंदी काढली असल्याचं समोर आलं आहे. मेहंदीचा व्हिडीओ शेअर करत तिने साखरपुड्याची तारीखही जाहीर केली आहे. अभिनेत्री उद्या म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ रोजी साखरपुडा समारंभ उरकणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – लाईव्ह परफॉर्मन्स सुरु असतानाच अंतर्वस्त्र फेकलं आणि…; कलाकारानेच दाखवलं नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

तिने तिच्या हातावरच्या सुंदर आणि नक्षीदार मेहंदीसह एक व्हिडीओ शेअर करत “सुरुवात झाली…साखरपुड्याला फक्त एक दिवस बाकी”, असं कॅप्शन दिलं आहे. या नक्षीदार मेहंदीने खास लक्ष वेधून घेतलं आहे, कारण या मेहंदीमध्ये प्राजक्ताने तिच्या आणि तिच्या होणाऱ्या नवर्याच्या नावाचे पहिले अक्षर काढले आहे. या मेहंदीमध्ये एक मुलगा मुलीला अंगठी घालताना दिसत आहे, शिवाय love असं इंग्रजीतही लिहिलं आहे.

आणखी वाचा – ऋता दुर्गुळेला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री भावुक, पतीकडूनही कौतुकाचा वर्षाव, म्हणाला, “तुला अपेक्षा आहे…”

View this post on Instagram

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaaa.gaikwad)

प्राजक्ताच्या मेहंदीमध्ये दोन अंगठ्या पाहायला मिळत आहे, यांत एका अंगठीमध्ये S हे अक्षर आहे. तर दुसऱ्या अंगठीमध्ये P असं लिहिलं आहे. यावरुन प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव S या अक्षरापासून सुरु होत असल्याचं कळतंय. पण अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. साखरपुड्यानंतर आता अभिनेत्रीचा होणार नवरा कोण आहे हे समोर येईल. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा आता अभिनेत्रीच्या साखरपुडा समारंभाकडे लागून राहिल्या आहेत.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Tanaji Galgunde Goodnews

'सैराट' फेम तानाजी गळगुंडे होणार बाबा?, गुपचूप लग्नाची चर्चा झालेल्या मुलीने शेअर केले डोहाळजेवणाचे फोटो, नक्की सत्य काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.